विधानपरिषदेची निवडणूक : काही धडे
भाष्य : मा. गो. वैद्य
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल दि. ३० नोव्हेंबरला जाहीर झाले. संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे विधानपरिषदेचे निकाल नसतात. विधानसभेच्या ४-२ ठिकाणच्या पोटनिवडणुकींचेही निकाल राज्याच्या भावी राजकारणाची दिशा व्यक्त करू शकतात, तशी स्थिती विधानपरिषदेच्या निवडणुकीची नसते. तथापि, यावेळच्या निवडणुकीने काही पाठ, नक्कीच दिले आहेत.स्थानिकांची उपेक्षा नको.
स्थानिकांची उपेक्षा नको
निवडणूक फक्त आठ मतदारसंघांत झाली. अमरावती व नाशिक मतदारसंघातील निवडणूक पदवीधर मतदारसंघातून होती; भंडारा-गोंदिया, यवतमाळ आणि जळगाव मतदारसंघातली निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो मतदारसंघ असतो, त्यातून होती; तर नागपूर, कोकण आणि मराठवाडा क्षेत्रातील निवडणूक शिक्षक मतदारसंघासाठी होती. आणखीही तीन मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पण त्या सर्व ठिकाणी उमेदवार निर्विरोध निवडून आले. या तीनपैकी पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निर्विरोध निवडणूक काहीशी गाजली. कारण, तेथे उभ्या असलेल्या भाजपाच्या उमेदवाराने, ऐनवेळी, आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निर्विरोध निवडून आला. उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयात, पुणे नगर व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांना सहभागी करून घेण्यात आले नव्हते; म्हणजे त्यांची उपेक्षा झाली. स्वाभाविकच, कुणाही पदाधिकार्याला याचा राग आला असता. तसा आमदार गिरीश बापट यांनाही आला आणि त्यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कुणालाही असेच वाटेल की, आ. बापट यांची प्रतिक्रिया योग्य होती, पण कालच मला एका अनुभवी पत्रकाराने सांगितले की, हा सारा राग लटका होता. ‘मॅच फिक्सिंग’सारखा होता. ‘मी मारतो, तू रड’ अशा प्रकारचा होता. त्याचे म्हणणे असे की, आमदार बापटांना, त्यांची उपेक्षा करण्यात आली, असे वाटत होते, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? मला, व्यक्तिश:, त्या पत्रकाराचा युक्तिवाद मान्य नाही. त्यांची उपेक्षा झाली हे खरेच असणार. निर्णय राज्यपातळीवरून घेतला गेला असेल. शिवाय ‘पुणे-पॅटर्न’ आता अगदी अभिनव म्हणावा, असा उरलेलाही नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना-भाजपा युती यांचे पुण्याच्या स्थानिक महापालिकेच्या राजकारणात मेतकूट जमले होते. या मेतकूटप्रकरणी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अग्रणी भूमिका होती. पाच वर्षांपूर्वी, असे घडू शकते, तर यावेळी का नाही? एवढे मात्र खरे की, असे कळीचे निर्णय घेताना, स्थानिक पदाधिकार्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. पक्षसंघटनेच्या निरोगी वाटचालीसाठी, सामूहिक निर्णय केव्हाही लाभदायकच असतात.
सुरेशदादांचे कारस्थान
जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीचे कवित्व मात्र बराच काळ मुखर होत राहील, असे दिसते. या मतदारसंघातून, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, एकनाथ खडसे यांच्या चिरंजीवांचा पराभव झाला. पराभव फक्त १६ मतांनी झाला असला, तरी पराभव तो पराभवच. या पराभवासाठी, जळगावची स्थानिक शिवसेना किंवा खरे म्हणजे पक्षबदलाबद्दल राज्यभर विख्यात असलेले सुरेशदादा जैन हे जबाबदार आहेत; आणि सुरेशदादांनीही ही जबाबदारी नाकारली नाही. सुरेशदादा सध्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे, भाजपाच्या पराभवासाठी योजिलेल्या कारस्थानाचा चिखल, शिवसेनेवरही, आपले शिंतोडे उडविल्याशिवाय रहावयाचा नाही. शिवसेनेने भाजपाचा विरोध का करावा, याचे कोडे कुणालाही पडेलच. सुरेशदादांची चाल उद्धव ठाकरे यांना माहीत नसण्याची शक्यता वाटत नाही. एकनाथ खडसे यांनी आपल्या मुलासाठी तिकीट मिळविले म्हणून भाजपाचे काही कार्यकर्ते नाराज झाल्याची वार्ता नाही. घराणेशाही आता बहुतेक सर्वच पक्षांमध्ये स्थिरपद झालेली आहे. कॉंग्रेसमध्ये ती अनेक वर्षांपासून नांदत आहे. तामीळनाडूपासून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांमधील प्रादेशिक पक्षांमध्ये तर ती ढळढळीतपणे दिसते. शिवसेनाही त्यापासूनअलिप्त नाही. भाजपातही ती शिरली आहे; आणि जोपर्यंत संघटनेची बाजू समर्थ व शक्तिशाली होणार नाही, तोपर्यंत या प्रवृत्तीला धोका नाही. माझे तर पुष्कळ विचारान्ती हे मत झालेले आहे की, सर्वसामान्य भारतीय मनाला, घराणेशाही भावत असते. त्यामुळे, एकनाथ खडसे यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळवून दिले, हे जसे अप्रूप नाही, तसे ते टीकास्पदही वाटण्याचे कारण नाही. सुरेशदादा जैन यांना हे पसंत पडले नाही. खडसे यांचे वर्चस्व वाढू न देण्याच्या भावनेपोटी आपली वेगळी व्यूहरचना त्यांनी केली. जळगाव शहरात त्यांचा प्रभाव आणि दरारा आहेच. त्याचा उपयोग करून, त्यांनी खडसे यांना धडा देण्याचा संकल्प केला, आणि तो तडीस नेऊन दाखविला, असेच म्हटले पाहिजे. जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले मनीष जैन हे काही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार नव्हते. ते बंडखोर उमेदवार होते. पण, सुरेशदादांनी आपली सर्व शक्ती त्यांच्या मागे लावली व त्यांना निवडून आणले. जळगावात मी ‘दादा’ आहे, माझ्यापुढे खडसे टिकू शकत नाहीत, हे त्यांना दाखवायचे होते व त्यात ते सफल झाले.
युतीला धोका नसावा
जळगावातील या घडामोडीचा परिणाम, राज्यव्यापी शिवसेना-भाजपा युतीवर होईल काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर सुरेशदादांची जी वक्तव्ये प्रकटली, त्यावरून, त्यांचे लक्ष फक्त जळगाव व जळगाव जिल्हा एवढ्यापुरतेच सीमित असावे, असे दिसते. त्यांची तालेवार दादागिरी शिवसेनेला, त्या मर्यादित क्षेत्रापुरतीच चालू असणे लाभाचे आहे, हाच शिवसेनेचाही हिशेब असावा. त्यामुळे, राज्यव्यापी युतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही. मुंबई महापालिकेच्या किंवा अशाच अन्य मर्यादित क्षेत्रापुरता बेबनाव राहू शकतो. तसा तो कॉंग्रेस व राकॉं या दोन पक्षांमध्येही दिसून येतो. पण त्या दोन पक्षांच्या आघाडीच्या तुलनेत या दोन पक्षांच्या युतीचा आधार, भावनिक तसेच सैद्धांतिक दृष्टीने अधिक बळकट आहे. त्यामुळे, स्थानिक पातळीवरील ताणतणावावरून राज्यपातळीवरील युतीला सध्याच धोका उत्पन्न झाला आहे, असा तर्क करणे जरा घाईचेच होईल.बी.टीं.चा पराभवअमरावती पदवीधर मतदारसंघात प्रा. बी. टी. देशमुखांचा पराभव मलाही दु:ख देऊन गेला. बी.टी. देशमुख हे अत्यंत अभ्यासू, निर्भय असे झुंजार नेतृत्व आहे. त्यांचा व्यापक संपर्क आहे. कोणत्याही पक्षाशी किंवा विचारधारेशी त्यांची बांधिलकी नाही. पण जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणण्याची गुणग्राहक वृत्ती आहे; आणि जे त्यांच्या बुद्धीला पटत नाही, त्याचा विरोध करण्याची वीरवृत्तीही त्यांच्या ठिकाणी आहे. अमरावती विद्यापीठाची निर्मिती होण्यापूर्वी, तत्कालीन संपूर्ण आठ जिल्ह्यांच्या विदर्भासाठी नागपूर विद्यापीठ, हेच एकमेव विद्यापीठ होते. त्या विद्यापीठाच्या घटकव्यवस्थेतील काही अधिकारिणींशी माझाही प्रदीर्घ असा जवळून संबंध होता. त्या काळापासून मी त्यांना ओळखतो; आणि त्यांच्या अभ्यासू, निर्भीड वृत्तीचा मी प्रशंसकही आहे. त्यामुळे, त्यांचा पराभव मलाही एक बोच देऊन गेला आणि मग माझ्या मनात आले की, प्रत्येकानेच स्वत:हून कुठे थांबायचे हे ठरविले पाहिजे. नानाजी देशमुखांनी ते ठरविले आणि संसदीय राजकारणापासून अलग होऊन, वेगळे क्षेत्र निवडले. तेथेही आपली प्रतिभा व परिश्रम यांच्या बळावर, त्यांनी एक आगळेवेगळे कार्य करून दाखविले. नानाजींनी वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेतली. तसे सर्वांनी केले पाहिजे, असे म्हणता येणार नाही. नानाजी खरेच आगळेवेगळे होते. कोण, अनायासे आलेले केंद्र सरकारातील मंत्रिपद नाकारेल? पण नानाजींनी ते नाकारले.
योग्य वेळी निवृत्ती आवश्यक
तथापि, आपल्या निवृत्तीचा विचार प्रत्येकाच्या मनात यावा असे मला वाटते. आणि हे जमणे कठीण नाही. यातच त्याची शान व मान असते. म्हणूनच मला सेवानिवृत्तीच्या वयाची सरकारी अट पसंत असते. विद्यापीठ आणि अन्य काही शिक्षण संस्थांशी माझा संबंध होता. त्या सर्व ठिकाणी नोकरीच्या मुदतवाढीला माझा विरोध असे. यामुळे, काही जवळचे मित्रही नाराज होऊन दुखावल्याचे मला ज्ञात आहे. पण हा परिणाम मी सहन केला. माझे म्हणणे असे की, तुमच्या मुदतवाढीमुळे, एका होतकरू तरुणाचा प्रवेश रोखला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत, खरे म्हणजे हिंदू संस्कृतीत, याच दृष्टीने वानप्रस्थाश्रमाची व्यवस्था होती. आताही ती व्यवस्था उपयुक्त आहे. पण याचा अर्थ वनात जावे, असा करण्याचे कारण नाही. समाजातच राहावे, मात्र पैसा, पद वगैरे प्राप्त करण्याच्या धडपडीत पडू नये, पण निरपेक्षपणे समाजाच्या उपयोगी असणार्या कार्याशी स्वत:ला जोडून घ्यावे. रा.स्व. संघात, आता अशी पद्धती मूळ धरू लागली आहे. हे चांगले आहे. आपल्या पश्चात्, कमीत कमी आपल्या योग्यतेचे कार्यकर्ते आपल्याला उभे करता आले पाहिजे. अनेकांना, आपल्यावाचून अडले, याचाच आनंद व अभिमानही असतो. मला ही वृत्ती संकुचितपणाची वाटते. आपल्या वाचूनही उत्तम कार्य होत आहे, याचा आनंद वाटला पाहिजे. आपले उत्तराधिकारी, आपल्यापेक्षाही सरस आहेत, हे जाणवल्याचा आनंद अधिक मोलाचा असतो. कारण, येणारी पिढी, जुन्या पिढीच्या खांद्यावर उभी राहत असते; स्वाभाविकच तिला एक उंची आपोआपच प्राप्त झालेली असते. जमिनीवर उभे असलेल्यापेक्षा, कुणाच्याही खांद्यावर उभा असलेल्याला अधिकची उंची लाभणारच. बी. टी. देशमुख सतत ३० वर्षे, पदवीधरांच्या मतदारसंघातून निवडून येत होते. ते थांबले असते, आणि कुणा लायक उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण शक्तिनिशी उभे राहिले असते, तर त्यांचा गौरव अधिक वाढला असता. सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यापेक्षाही हा निवृत्तीचा गौरव अधिक शोभून दिसला असता. दुर्दैवाने, तसे झाले नाही. नियतीने ते होऊ दिले नाही, असेच म्हटले पाहिजे. नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डायगव्हाणे यांचा पराभवही, याच कारणाने झालेला असू शकतो. डायगव्हाणे यापूर्वी तीन वेळा याच मतदारसंघातून निवडून आले होते. लोकांना काहीतरी नवे हवे असते. दर पाच-सहा वर्षांनी, बनणार्या सुधारित मतदारयादीत, नवे मतदार मोठ्या संख्येने येत असतात. जुने निवृत्त होत असतात. त्यांना नवा प्रतिनिधी हवा असतो. तात्पर्यअसे की, केव्हा थांबायचे हे आपल्याला ठरविता आले पाहिजे. जेथे पद आणि पैसा याचा संबंध आहे, त्या क्षेत्राच्या निरामय प्रगतीसाठी हे आवश्यक आहे, असे माझे मत आहे.
डॉ. पाटील यांचे दुहेरी अभिनंदन
प्रा. बी.टी. देशमुख यांच्यासारख्या सुप्रतिष्ठित लोकप्रिय उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेले डॉ. रणजित पाटील यांचे अभिनंदन केले पाहिजे. प्रा. बी.टी. देशमुखांचा पराभव करणे सोपे नव्हते. ती अवघड कामगिरी डॉ. पाटील यांनी केली. डॉ. पाटील शिक्षणक्षेत्राशी संबंधित नाहीत. ते ऑर्थोपीडिक्स डॉक्टर म्हणजे अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत. अकोल्याला त्यांचा दवाखाना आहे. व्यावसायिक डॉक्टर असलेल्या व्यक्तीने निवडणुकीच्या स्पर्धेत उतरावे हे एक आश्चर्यच आहे. पण ते आश्चर्य घडले; आणि दुसरे आश्चर्य म्हणजे ते निवडून आले. गेली तीस वर्षे, बी.टी. पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. या मतदारसंघात, स्वाभाविकच, शिक्षणक्षेत्राशी संबद्ध असलेल्यांचे बाहुल्य असणार. त्या भरभक्कम आधारावरच बी. टी. निवडून यावयाचे, पण यावेळी पदवीधर मतदारांच्या मनात विचार आला असावा की, पदवीधरांचा प्रतिनिधी शिक्षकच का असावा? शिवाय, शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ आहेच की ! त्यांनी तेथूनच उभे राहावे, असा विचार अन्य पदवीधरांच्या मनात येणे अस्वाभाविक नाही. यापूर्वीही अनेकदा, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिक्षकेतर उमेदवारांनी केलेले आहे. पं. बच्छराज व्यास, रामजीवन चौधरी, बापूसाहेब सोहनी, वि.घ. देशपांडे, वि.मा. सुभेदार, मोतीराम लहाने, गोविंदराव आठवले, नीतीन गडकरी ही नावे सहजच समोर येतात. बापूसाहेब सोहनी आणि मोतीरामजी लहाने हे अमरावती विभागातीलच होते, पण तेव्हा, संपूर्ण विदर्भ हा एक मतदारसंघ गणला जाई. १९८० पासून मात्र बी.टी. देशमुखच या अमरावती विभागातून निवडून आलेले आहेत. तेव्हा २०१० साली, या विभागातील बहुसंख्य मतदारांनी शिक्षकेतर व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावयाचे ठरविले असेल, तर ते स्वाभाविकच मानावे लागेल. हा मान यावेळी डॉ. रणजित पाटील यांना मिळाला.पण डॉ. पाटील यांच्या अभिनंदनाचे आणखी एक कारण आहे आणि ते निवडणुकीतील यशापेक्षाही त्यांचा गौरव अधिक वाढविणारे आहे. त्यांनी निवडणुकीतील या यशाच्या आनंदाने आपली बुद्धी व मन विकृत होऊ दिले नाही. हेही सोपे नाही. यश अनेकांच्या मनाला अहंकाराने ग्रस्त करून टाकते. कधी कधी तर ते माजही निर्माण करते. डॉ. रणजित पाटील यांच्या ठिकाणी ही विकृती आली नाही. त्यांनी आपल्या विजयानंतर प्रा. बी.टीं.च्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना वंदन केले आणि त्यांनी आपले मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थनाही केली. बी.टीं.नीही त्यांचे अभिनंदन केले. विनोबा भावे नेहमी म्हणत असत की, ‘‘निवडणूक लढली जाऊ नये; ती खेळली जावी.’’ खेळातही हार-जीत होतच असते. पण जिंकलेल्याला, हरणारा आपला शत्रू वाटत नाही. डॉ. पाटील यांनी खेळाडूच्या या निरोगी वृत्तीचे दर्शन घडविले. या उमदेपणाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्रिवार अभिनंदन!
दै. तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. ५ डिसेंबर २०१०