मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन
काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातून एक प्रतिनिधी मंडळ, त्यांच्या राळेगणसिद्धीच्या निवासी आले. अण्णांना भेटल्यानंतर प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पाकिस्तानच्या दौर्यावर येणाचा आग्रह केला. मागील काही दिवसांपासून अण्णांचे प्रसारमाध्यमांशी जोडले जाणे, हाच या दौर्याचाही उद्देश होता. दिल्लीमध्ये अण्णांचे उपोषण चालू असताना पाकिस्तानातील वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित होत होत्या की, पाकिस्तानमध्येही काही लोक अण्णांप्रमाणे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू करू इच्छितात. अण्णांचे आंदोलन सङ्गल झाल्याने पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाने भारतात येऊन अण्णांना विनंती केली की, त्यांनी पाकिस्तानमध्ये येऊन भ्रष्टाचार मिटवण्यासाठी तेथील जनेतेचे नेतृत्व करावे. पाकिस्तानबरोबच दुबईतही असेच दृश्य पाहण्यास मिळाले. तेथे भारतीयांबरोबर पाकिस्तानीही यामध्ये सामील होते. अण्णांनी पाकिस्तानी नागरिकांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि सांगितले की, ते अवश्य तेथे येतील. भारतीय वर्तमानपत्रांत जे काही प्रकाशित होत आहे त्यानुसार अण्णांनी पाकिस्तान्यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. ते केव्हा पाकिस्तानात जातील हे ठरलेले नाही, परंतु पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ या विश्वासाने परत गेले आहे की, अण्णा हजारे पाकिस्तान्यांच्या दु:खात सहभागी होतील आणि भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व करतील, परंतु अजून तारीख ठरलेली नाही. अण्णा हजारे यांचे नेतृत्व पाकिस्तानी स्वीकारतील, यापेक्षा सुखदायक गोष्ट कोणती असू शकेल? अण्णा एक ग्रामीणवासी आहेत, परंतु ते जाणून आहेत की, पाकिस्तान सरकार त्यांना व्हिसा देणार नाही. त्यामुळे त्यांचा पाकिस्तानला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीयांच्या शुभेच्छा आहेत की, अण्णा अवश्य पाकिस्तानात जावेत आणि पाक जनतेच्या दु:खात सहभागी व्हावेत. परंतु अण्णा काय आपण पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर आपल्या सवयीप्रमाणे ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’चा नारा देणार? जर आपणास असे करण्यास रोखले, तर मुश्कील होईल म्हणून आपण तेथे जाण्याऐवजी पाकिस्तानलाच येथे बोलावून घ्यावे. अण्णा, आपण १९६५ च्या युद्धात पाकिस्तानबरोबर केलेल्या लढाईत भाग घेतला होता. आपल्या शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह तुम्ही ट्रकमध्ये ठेवत होतात. आपल्या कपाळावर गोळी लागली होती. त्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांना आपण हे नाही विचारलं की, त्यावेळेस आमच्यावर तशी चढाई का केली म्हणून? ज्या पाकिस्तान्यांचे इतक्या वर्षांनंतरही हृदयपरिवर्तन झाले नाही. अण्णा, काय आता त्यांचे विचार बदलतील? आपल्या देशावर ज्यांनी अन्याय केला, त्यांचे हृदय बदलेल? जे आपणास बोलावण्यास आले होते, त्यांना या गोष्टीविषयी पश्चात्ताप आहे? त्याच अत्याचारी देशात जर आपण पुन्हा जाल, तर आपल्यासोबतच्या त्या शहीद जवानांचा आत्मा काय म्हणेल? काय त्यावेळेस तेथे शहीद झालेल्या आपल्या साथींना श्रद्धांजली अर्पण कराल? पाकिस्नानची सेनाही लाचार भ्रष्टाचाराशी लढण्यापूर्वी आपल्याला या गोष्टीचे चिंतन करावे लागेल की, पाकिस्तानात भ्रष्टाचारामुळे आतंकवाद आला की आतंकवादामुळे भ्रष्टाचार? जाण्याची काय आवश्यकता आहे. सारे विश्व सांगत आहे की, तो एक मृतप्राय देश आहे. स्वयं त्या देशातील नेत्यांनीही याचा स्वीकार केला आहे. येणार्या दहा वर्षांत पाकिस्तान राहील की नाही, हे सांगणे कठीण आहे. पाकिस्तानचा सीमा प्रदेश अङ्गगाणिस्तानमध्ये समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण सीमा प्रदेश आतंकवाद्यांचा मजबूत गड बनला आहे. या प्रदेशाला वाचवू शकेल इतकी पाकिस्तान सरकारमध्ये ताकद नाही. बलुचिस्तानमध्ये नेहमी दंगल होते. तेेथे पाकिस्तानी सरकारचे कायदे चालत नाहीत. बलुची लोकांची भाषा ङ्गारसी आहे आणि तेथील लोकांवर इराण संस्कृतीची छाप आहे. त्यांच्या चर्चसाठी प्रथम रशिया कब्जा करू इच्छित होता, परंतु नंतर अमेरिका आली. अमेरिकेने आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करताच, अङ्गगाणिस्तानातील जितके लोक होते ते अमेरिकेशी दोन हात करण्यास पुढे आले. पाकिस्तानने भारतीय काश्मीरच्या ज्या भागावर आपला कब्जा मिळवला आहे, तो आता चीनच्या ताब्यात आहे. पाकिस्तान सिंध आणि पंजाबवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, परंतु अण्णा, इस्लामाबादच्या लाल मशिदीत काय झाले, याची माहिती आपल्याला आहे. पाकिस्तानात तेथे तालिबान आणि शंभर-सव्वाशे आतंकवाद्यांचा गट ज्या प्रकारे अस्थिरता निर्माण करत आहे त्यावरून असे म्हणता येते की, जिन्नांचे पाकिस्तान खूप दिवस राहू शकणार नाही. कराचीमध्ये पाकिस्तानची सेनाही लाचार झाली आहे. पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिकेनेही आता त्याचे चरित्र ओळखले आहे. म्हणून पाकिस्तान राहणारच नाही, तर अण्णा तेथे कशासाठी जाणार? पाकिस्तान समाप्त होईल, असे जगातील मोठे राजनीतिज्ञ आणि मोठ्या शक्तींचे म्हणणे आहे. अण्णा, आपण आपल्या येथे आलेल्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांना असा आग्रह धरावा की, मी तेथे येण्याऐवजी तेथे काही राहिले असेल ते भारतात घेऊन यावे. हे आपणासाठी योग्य होईल. आपल्या दुरावलेल्या आणि अडचणीत असलेल्या पुत्रांच्या पापांना क्षमा करून आपल्यात समाविष्ट करून घेण्याची ताकद भारतमातेजवळ आहे. भारतमातेचा जयजयकार आपण उपोषणादरम्यान नेहमी केला आहे. पाकिस्तानचा जन्मच भ्रष्टाचाराने झाला आहे. सारे जग जाणून आहे की, लाहोरमध्ये ६० टक्के हिंदू होते, म्हणून विभाजनाच्या वेळी लाहोरच्या आर्य समाजी नेत्यांनी असा आवाज उठवला की, हिंदू लोकसंख्येच्या आधारावर लाहोर भारताला मिळायला हवे. विभाजनाची रेखा तयार करणार्या रेडक्लिङ्गने तत्कालीन आर्य समाजाच्या नेत्यांना मागणी केली की, २० लाख रुपये द्यावे आणि लाहोरला प्राप्त करावे. आर्य समाजी नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना खूप समजावले, परंतु त्यांचे काहीही चालले नाही. केवळ २० लाखामध्ये लाहोर विकला गेला. १३ ऑगस्ट २०११च्या टाइम्स ऑङ्ग इंडियाने आपल्या १७ व्या पानावर, १९४७ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये काय चालले होते, याविषयी एक माहिती प्रकाशित केली आहे. यामध्ये ढाकाच्या ९४ वर्षीय रवींद्रनाथ दत्ता गुप्ता आणि कोमिलाचे ९० वर्षीय इंद्रकुमार सिंह नामक दोन हिंदूंची भेटवार्ता प्रकाशित केली आहे. दोघांची अडचण ही होती की, विभाजनाच्या वेळी दोन्ही नगर हिंदुबहुल होते. खुलनामध्ये ९२ टक्के हिंदू होते आणि ढाका तसेच चिटगोंगमध्ये ७० टक्क्यांहून अधिक. त्या वेळी असे ठरले होते की, हे दोन्ही नगर दिल्लीच्या केंद्रीय सरकारप्रमाणे राहतील, परंतु नंतर परिस्थिती पालटली. त्यांना या गोष्टीचे दु:ख आहे की, हा निर्णय का बदलला गेला? बहुतेक विभाजन करणार्यांचे खिसे गरम झाले असतील. म्हणून हिंदुबहुल क्षेत्र पाकिस्तानच्या हवाली केले गेले. विभाजनासाठी सहमत आहे असे म्हणून प्रथम लॉर्ड माऊंटबॅटन, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम या कागदपत्रांवर स्वाक्षर्या केल्या. विभाजन कसे होईल आणि कोणते क्षेत्र कुणाला मिळेल हे सर्व नंतर ठरले. म्हणून सत्य हे आहे की, विभाजनच पूर्णत: चुकीचे झाले आहे. भ्रष्ट इंग्रज विकले गेले आणि मुस्लिम लीग लोकांची चांदी झाली. म्हणून अण्णा, ज्या देशाचा पिंडच भ्रष्टाचारी आहे, त्याला अगोदर ठीक केले पाहिजे. नंतर आपण भ्रष्टाचार निवारणाच्या गोळ्या पाकिस्तान्यांना सेवन करण्यास द्यावे. विभाजनाच्या वेळी इंग्रजांना भ्रष्ट करून यांनी राजा, राजवाडे, नवाब आणि धर्मगुरूंच्या पैशाने हवे ते खरेदी केले आणि त्याचे नाव पाकिस्तान असे दिले गेले. जो खरेदी करू शकतो तो विकूही शकतो. म्हणून चीनला काय काय दिले आहे, हे कुणापासून लपून राहिले नाही. चीन सध्या भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत आहे. पाकिस्तानला सुविधाही देत आहे आणि मनाप्रमाणे पैसा, शस्त्र आणि सुविधाही देत आहे. म्हणून आंदोलन त्या देशासाठी केले जाते जे आपल्या मातृभूमीचे रक्षण करेल. येथे तर मातृभूमीला विकण्यास आणि भारताच्या शत्रुत्वामुळे देशाला दानामध्ये देण्याची परंपरा आहे त्या देेशासाठी चारित्र्याच्या आधारावर आंदोलन करण्याचे काय औचित्य? त्यांच्यात मातृभूमी म्हणजे एक जमिनीचा तुकडा आहे म्हणून ते वंदे मातरम्चा विरोध करतात. देशाला विकण्याचा भ्रष्टाचार आपल्यासारखेच एक देशभक्त आणि कॉंग्रेसचे समर्पित महाराष्ट्राचे नेता नरहरी विष्णू गाडगीळ यांना पाटबंधारेमंत्र्याच्या रूपात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर नेहरी पाणी समझोत्यासाठी पाकिस्तानला पाठवले होते. आपणास विनंती आहे की, त्यांचे जीवन (चरित्र) आपण अवश्य वाचावे, मग आपणास माहीत होईल की, पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यांच्याशी कसा व्यवहार केला आहे? भारतातून कोणताही नेता बातचीत करण्यासाठी गेल्यानंतर जिना केवळ आपल्या मुंबईस्थित मलबार हिलच्या बंगल्यासंदर्भात बोलत असे. त्यांचा प्रयत्न असे की, त्यांच्या बंगल्याला कस्टोडियन प्रॉपर्टी घोषित करून भारत सरकारने त्याच्यावर कब्जा करू नये. पाकिस्तानात भारताचे प्रथम राजदूत श्री. प्रकाश यांचे पुस्तक वाचल्यानंतर आपणास सर्व प्रकार माहीत होईल. आपल्या संपत्तीची चिंता करणारे देशाची चिंता करत नसतात. भारतात भ्रष्टाचार हा धन आणि संपत्ती मिळवण्यासाठीचा आहे, परंतु पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार आपल्या देशाला विकण्याचा आहे. अखंड भारत यावर विश्वास करणार्या आपल्या पासपोर्टवर पाकिस्तानी व्हिसाचा शिक्का मारत नसतात.
तरुण भारत, 9/29/2011

टोपीचा वाद आणि वादाची टोपी
मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैनभारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे दिसू लागल्याने ‘कॅप’ हा शब्द स्वीकारला गेला. जिना यांच्या टोपीचा रंग काळा होता आणि त्यावर केसही होतेे. आजही त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही. मात्र, जिनांची विशेष ओळख असलेल्या या परंपरेला पाकिस्तानी लोकांनी जपले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सद्भावना मिशन अंतर्गत केलेल्या तीन दिवसीय उपवासाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. मोदींच्या या उपवासाबाबत पुढील अनेक दिवस तर्कवितर्क सुरूच राहणार आहेत. मात्र, कुठल्यातरी व्होटबँकेला आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या सिद्धांतांशी तडजोड करणार नाही हे मोदी यांनी या उपवासादरम्यान घडलेल्या एक घटनेतून दाखवून दिल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. मोदी ज्याठिकाणी उपवास करत होते त्याठिकाणी असलेल्या प्रचंड गर्दीत अनेक प्रकारच्या टोप्या आणि शाली बघायला मिळत होत्या. भेटीसाठी येणार्या प्रत्येकाशी नरेंद्र मोदी यांनी गळाभेट करून त्यांचे अभिवादन स्वीकारले. नरेंद्र मोदी यांना उपस्थितांमधील कुणाच्याही वेषभूषेवर किंवा पेहरावावर आपत्ती नव्हती तर मग स्वत: मोदी यांनी काय परिधान करावे आणि कुणाकडून काय स्वीकारावे याबाबत उपस्थितांपैकी कुणालाही आपत्ती असण्याचे कारण नाही. त्यामुळेच ज्या मौलवींची टोपी मोदी यांनी घातली नाही त्या महोदयांना किंवा इतरांना याचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. या सद्भावना मिशनमध्ये कुठल्याही राजकारणाला थारा न देण्याचा मोदींचा प्रयत्न होता. त्यामुळेच अशी टोपी घातल्याने एखाद्या विशिष्ट समुदायाला मतांसाठी आकर्षित केल्याचा आरोप होऊ नये म्हणून मोदी यांनी ती टोपी घालण्यास नकार दिला. टोपी घालण्यास नकार दिल्याने कुणाचाही अपमान होत नाही. असे असते तर मग त्याच मौलवींनी भेट म्हणून दिलेली शाल त्यांनी स्वीकारलीच नसती. शाल आणि फेटा हा आमच्या देशात सन्मानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे सर्वच समारंभांमध्ये याचे आदानप्रदान होते. मुस्लिम समाजातही शाल आणि फेट्याचा उपयोग केला जातो. राजस्थानमध्ये टोपीऐवजी पगडी बांधण्याचा रिवाज आहे. आपल्या उत्तराधिकार्याची नेमणूक करण्यासाठी त्याला पगडी बांधली जाते. मुस्लिम बादशहांच्या भाषेत याला राज्याभिषेक असे म्हटले जाते. कुठेही टोपी हा शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही. तसेही आताच्या लोकशाहीत या सगळ्या गोष्टी अप्रासंगिक झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी ‘सर सलामत तो पगडी हजार’, ही अतिशय जुनी म्हण अजूनही प्रचलित आहे. शाल, फेटा आणि पगडी या गोष्टी धर्म आणि संप्रदायांपेक्षा मोठ्या आहेत. परंतु, टोप्यांना आता पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. राजकपूरसारख्या महान कलाकारानेदेखील आपल्या गीतातून ही गोष्ट मान्य केली आहे. ‘सर पर लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी’ म्हणजेच लाल रंग ही साम्यवादाची निशाणी असली तरी माझे मन मात्र हिंदुस्तानीच आहे असा त्याचा अर्थ. म्हणूनच आपल्या उपवासाच्या कार्यक्रमाला राजकारणाचा स्पशर्र् न होऊ देण्याची दूरदृष्टी दाखविणारे मुख्यमंत्री मोदी अभिनंदनास पात्र आहेत. टोपीचे आदानप्रदान हा कायमच वादाचा विषय राहिला आहे. काही टोप्या या विशिष्ट वर्ग किंवा समुदायाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांच्या वर्गीकरणानुसार कुणीही कुणाकडे बोट दाखवू शकतो. याचाच सरळ अर्थ असा की, टोप्यांचा रंग आणि आकाराने एकाधिकार प्रस्थापित केला आहे. ही त्यांची ओळखही आहे. काही कारणामुळे जर ही टोपी बदलली तर तो टोपी बदलू असल्याचे उपहासाने म्हटले जाते. ही साहित्यातील एक प्रचलित म्हण झाली आहे. एवढेच नव्हे, तर टोपीवरून अजूनही बरेच काही बोलले जाते. उदा: टोली घालणे, टोपी फेकणे, इत्यादी. एखादी व्यक्ती कुठल्या गोष्टीचा आपल्याला योग्य वाटणारा अर्थ काढत असेल तर काय करणार? त्याने तशीच टोपी घातली असल्याने त्याचा दृष्टिकोन तसा असल्याचे म्हटले जाते. प्राचीन सभ्यतेची ओळख करून देणारे चित्र किंवा गुफांमध्ये कुठेही पुरूष किंवा स्त्री टोपी घातलेले आढळून येत नाहीत. आमच्या जवळपास सर्वच धर्मांचे महापुरूष आणि पैगंबरांचा अभ्यास केला असता कुणीही त्यांच्या डोक्यावर टोपी घातल्याचे दिसून येत नाही. पवित्र हज यात्रेला जाणार्या पुरूषांच्या डोक्यावरही काहीच नसते. महिलांना मात्र आपल्या डोक्यावरचा एकही केस दिसता कामा नये असे स्पष्ट निर्देश दिले जातात. महिलांनी आपले डोके झाकावे अशी अपेक्षा सर्वच धर्म आणि समाजांमध्ये केली जाते. महिलांच्या केसांना सौंदर्याचे प्रतीक मानले गेले असल्याने केसांना नैतिकता आणि लाजेशी जोडण्यात आले आहे. डोक्यावर लहानात लहान कापडही बांधले जाते किंवा भारतासारख्या देशात तर विशाल साडीदेखील डोक्यापयर्र्ंत पोहोचते. थोरामोठ्यांचा आदर करताना आणि धार्मिक व सामाजिक कार्ये करत असताना डोक्यावर पदर घेणे बंधनकारक मानले जाते. जिन्स आणि टॉप घातलेल्या अल्पवयीन मुली तुळशीला पाणी घालताना मात्र आपल्या डोक्यावर दुपट्टा बांधलेल्या आढळतात आणि यातूनच भारतीय संस्कृतीचा प्रभाव स्पष्टवणे जाणवतो. मुस्लिम समाजात दुपट्ट्याची जागा बुरखा, रिदा आणि चादर घेत असते. चर्चमध्ये जात असताना प्रत्येक वयाच्या महिलेच्या डोक्यावर स्कार्फ असतो. हे सगळे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीमध्ये स्त्रीने आपले डोके झाकणे बंधनकारक असल्याचे आपल्या निदर्शनास येतेे. राजस्थान आणि अन्य अनेक ठिकाणी तर डोक्यावर असलेली साडी किंवा लुगड्याने चेहरा झाकला जातो. आपल्या बोली भाषेत याला घुंघट असे म्हणतात. माणसाच्या सन्मानाला टोपीशी जोडण्यात आले आहे. असे नसते तर एखाद्या चुकीच्या कामाबद्दल क्षमायाचना करणार्या व्यक्तीने मी तुमच्या पायाशी टोपी ठेवतो, असे कधीही म्हटले नसते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी डोक्यावर कधीही न घातलेली गांधी टोपी आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र, महात्मा गांधी यांनी कधीही याला विरोध केला नाही. कारण त्यावेळी ज्या टोपीचा रिवाज पडला होता ती टोपी खादीची होती. टोपी परिधान करणारा स्वत: चरख्यावर बसून ही टोपी तयार करत असे. वजनानी अतिशय हलकी असणारी ही टोपी अगदी सहजपणे धुतादेखील येत असे. महात्मा गांधी यांनी जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी कधीही या टोपीचा वापर केला नसला तरी ही टोपी म्हणजे सामान्य गांधीवादी माणसाची ओळख बनली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टोपी कॉंग्रेसवाल्यांची जहागिरी झाली होती आणि आता ट्रेड मार्क म्हणून ओळखली जाते. भारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे दिसू लागल्याने ‘कॅप’ हा शब्द स्वीकारला गेला. जिना यांच्या टोपीचा रंग काळा होता आणि त्यावर केसही होतेे. आजही त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही. मात्र, जिनांची विशेष ओळख असलेल्या या परंपरेला पाकिस्तानी लोकांनी जपले नाही. आता तर एकाही पाकिस्तानी नेत्याच्या डोक्यावर जिना यांची ती कॅप दिसत नाही. एकवेळ अशी होती की मुस्लिम लीगचा प्रत्येक नेता व कार्यकर्ता ही कॅप घालणे म्हणजे गर्वाची गोष्ट समजत असे. आता पाकिस्तानात मुस्लिम लीग नावाचे इतके पक्ष निर्माण झाले आहेत की त्यांची संख्या मोजणेही कठीण आहे. जिनांचा पक्ष एवढ्या तुकड्यांमध्ये विभागला जाण्यावर मार्मिक टिप्पणी करणारे एक कार्टुन लाहोर येथून प्रकाशित होणार्या दैनिक जिन्नाने प्रकाशित केले होते. जिना कॅपचे शेकडो तुकडे हवेत उडत असल्याचे त्या कार्टुनमध्ये दाखविण्यात आले होते. ‘एक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहॉं गिरा कोई वहॉं’, असे शिर्षक त्याखाली देण्यात आले होते. पाकिस्तानला जन्म देणार्या जिना यांच्याच टोपीचे पाकमध्येच अस्तित्व उरले नाही. मात्र, जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावर नवी दिल्ली येथे उपोषण करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. अण्णांच्या उपोषणाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या गांधी टोपीचा वारंवार आणि विशेष उल्लेख केला. टोपी या भारतीय शब्दाऐवजी ‘कॅप’ या शब्दाचा वापर करून आपण इंग्रजांसोबत असल्याचे जिनांच्या अनुयायांनी दाखवून दिले होते. कॅप या शब्दाचा अर्थ कळला नसला तरी तिला डोक्यावर मात्र घालून घेतले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील पायधुनी भागात एक नीमचवाला टोपी हाऊस आहे. आमच्याकडे १२५ वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तयार केल्या जातात अशी माहिती या हाऊसचे संचालक दिवंगत सैफुद्दीन भाई यांनी एकदा दिली होती. जगातील अनेक इस्लामी देशांमध्ये आम्ही या टोप्यांचा पुरवठा करतो, असेही त्यांनी सांगितले होते. कझाकिस्तानचे लोक सगळ्यात महाग टोपी घालतात आणि त्यामध्ये खर्या मोत्यांचा उपयोग केला जातो. इस्लामी जगतात तुर्की टोपी खूप प्रसिद्ध आहे. या टोपीच्या मधोमध निघणारी एक बट मागच्या भागाला लटकताना दिसते. प्रत्येक टोपीत काही ना काही नाविन्य असते, असेही त्यांनी सांगितले. सैफुद्दीन भाईंच्या जमान्यात २५ ते ८०० रुपयांपर्यंतच्या टोप्या त्यांच्या दुकानात उपलब्ध होत्या. मात्र, असे असले तरी सगळ्यात स्वस्त गांधी टोपीच आहे आणि ही कुठल्याही दुकानात नव्हे तर फक्त खादी भवन येथेच उपलब्ध असते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपवासादरम्यान मौलवींनी देऊ केलेली शाल नाकारली असती तर ते निश्चितच टीकेस पात्र होते. मात्र, त्यांनी अतिशय नम्रपणे आणि उत्साहाने ती शाल स्वीकारली. मौलानांनी देऊ केलेली टोपी त्यांनी डोक्यावर घालण्यास नकार दिला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. असे करून नरेंद्र मोदी यांनी त्या मौलानांसोबत मोठा न्याय केला आहे. मौलानांनी देऊ केलेली टोपी मोदी यांनी घातली असती तर मतांसाठी मोदी यांनी आता टोपीही घातली असा उपस्थितांचा समज झाला असता आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांच्यावर टीकाही झाली असती. मौलाना तर आपले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सर्व काही करत होते. परंतु, अल्पसंख्यकांची मते मिळविण्यासाठीच मोदी यांनी जाणूनबुजून असे केल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले असते. त्यामुळे मौलानांनी देऊ केलेली टोपी नाकारून नरेंद्र मोदी यांनी निर्माण होणार्या आणखी एका वादळाला शांत केले, असेच म्हणावे लागेल.
दै. तरुण भारत, सोलापूर.