अस्थिर धोरणांचा उद्योगांवर विपरित परिणाम : किशोर कटारे
कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू
सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे कदापी शक्य नाही, भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महानगरपालिका आकारते. जकात रद्द केली तर मनपाला फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेने तज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता वाढवता येणे सहज शक्य आहे. कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे. त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते.
......................................................................................................
कटारे टेक्स्टाईल्सची स्थापना कटारे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे यांचे वडील तिप्पण्णा तुळशीराम कटारे यांनी सन १९४९ साली करून आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ६१ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सध्या कटारे उद्योगसमूहाची धुरा विजय तिप्पण्णा कटारे, सुभाष तिप्पण्णा कटारे आणि किशोर तिप्पण्णा कटारे बंधुत्रयी वाहतात. यापैकी विजय कटारे हे अध्यक्ष आहेत, तर किशोर कटारे हे व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा संभाळतात आणि सुभाष कटारे हे संचालक आहेत. कटारे कुटुबीयांची तिसरी पिढी देखील आता व्यवसायात उतरली असून, राकेश कटारे व सचिन कटारे हे देखील कटारे उद्योगाच्या संवर्धनात कार्यरत आहेत.
![]() |
विजय कटारे अध्यक्ष |
सुरुवातीला तिप्पण्णा कटारे यांनी ‘कटारे टेक्स्टाईल्स’ या नावाने साड्यांचा कारखाना सुरू केला. सुरुवातीला साखरपेठेत ४ लूम्सवर हा व्यवसाय सुरू केल्याचे सांगून किशोर कटारे म्हणाले की, नंतर त्यांनी साड्यांबरोबरच चादरींचेही उत्पादन सुरू केले. त्यानंतर १९६२ साली अशोक चौक येथे उद्योगाचे विस्तारीकरण केले. सन १९७४ साली तुळशीदास कटारे यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीत सूत उत्पादनाचा (स्पिनिंग मिल) प्रकल्प सुरू केला. त्यानंतर तामलवाडी येथे सन १९७९ साली २५ हजार स्पिंडल आणि १० हजार डब्लिंग अशी एकूण ३५ हजार क्षमतेची सूतगिरणी उभी केली आणि १९८२ साली या सूतगिरणीत सुताचे उत्पादन सुरू झाले.१९९२ साली कटारे स्पिनिंग मिलच्या दुसर्या युनिटची सुरुवात करण्यात आली. तामलवाडीतील कमलानगर येथे सुरू केलेल्या या युनिटमध्ये १२ हजार ५०० स्पिंडलची सूतगिरणी सुरू केली. सूत उत्पादन उद्योगवृद्धीच्या एकेक पायर्या पादाक्रांत करणार्या कटारे उद्योगाच्या या यशस्वी वाटचाली बरोबरच कटारेबंधूंनी नव्या क्षेत्रात उडी घेतली आणि २० मार्च १९९७ साली सोलापूर शहराचे वैभव ठरलेल्या ‘हॉटेल त्रिपुरसुंदरी’ची सुरुवात केली. आज सोलापूरच्या प्रगतीत आघाडी घेतलेले त्रिपुरसुंदरी हॉटेल सोलापूरचे नामांकित हॉटेल ठरले आहे. ![]() |
सुभाष कटारे संचालक |
त्यानंतर २००० साली नव्या शतकात कटारे उद्योग समूहाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. कटारे उद्योगसमूहाने ऊर्जानिमिर्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात व्यंकुसावाडी येथे ३.५ मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू केला असल्याचे सांगून, आता आणखीन २.५ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिमिर्तीचे विस्तारीकरण लवकरच करणार असल्याचा मानस किशोर कटारे यांनी व्यक्त केला. तसेच तुळजापूर मार्गावर नवीन पंचतारांकित हॉटेल येत्या दोन वर्षांत सुरू करणार असल्याचा संकल्प किशोर कटारे यांनी बोलून दाखवला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
कटारे उद्योगसमूहांतर्गत कटारे स्पिनिंग मिल्स, कटारे कॉटन वेस्ट स्पिनिंग मिल, कमल मार्केटिंग प्रा. लि., श्री कमला साखर उद्योग लि., कटारे पॉवर्स लि. आणि कमला शैक्षणिक आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आदी प्रकल्प चालविले जातात. कटारे उद्योगसमूहाची मागील वर्षाची उलाढाल ३०० कोटी रुपयांची होती. तर येत्या वर्षात ३६० कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट आहे. कटारे उद्योगसमूहाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी उद्योगश्री, उद्योगरत्न, विजयरत्न असे काही सन्माननीय पुरस्कार लाभलेले आहेत. भारतातील बहुसंख्य मोठे उद्योजक, औद्योगिक घराणी ही टेक्स्टाईल्स उद्योगातूनच पुढे आलेली असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. त्यापैकी, रिलायन्सचे धीरूभाई अंबानी (विमल), मफतलाल, रतन टाटा, बिर्ला आदींसारख्या काही उद्योजकांकडे किशोर कटारे यांनी लक्ष वेधले. कटारे परिवाराबद्दल व उद्योगांविषयी लिहीत असताना कटारे कुटुंबीयांच्या आध्यात्मिक व धार्मिक कार्याचा उल्लेख टाळता येणार नाही. जगन्माता त्रिपुरसुंदरी महालक्ष्मीचे कटारे कुटुंबीय भक्त आहेत, तसेच साधक देखील आहेत. रोजची संध्यासाधना नियमित होत असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. कटारे यांनी कमलानगर (तामलवाडी) येथे महालक्ष्मीचे भव्य मंदिर बांधले आहे. अतिशय प्रसन्न वातावरण लाभलेले हे मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची प्रतिकृती आहे. येथे अनेक धार्मिक सेवा चालवल्या जातात. अशाप्रकारे कटारे परिवाराने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!....................................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास - व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे
![]() |
किशोर कटारे व्यवस्थापकीय संचालक |
शासनाकडे अखंड प्रगतीसाठी योग्य दिशेच्या आणि लांब पल्ल्याच्या योजना असणे नितांत गरजेचे असल्याचे किशोर कटारे म्हणाले. दर ५ वर्षाला सरकारने योजना बदलणे हे उद्योगवाढीला घातक आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. कारण आज उद्योगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अशा वातावरणात सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. शासनाने लघूद्योग, मध्यमोद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’ हे विधान अधोरेखित केले. केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही, असे ठाम प्रतिपादन किशोर कटारे यांनी केले. सोलापूर महापालिकेने जकात हटवावी किंवा ती माफक ठेवावी. कारण आज भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महापालिकाच आकारते. जर जकात उठवली गेली तर मनपा बजेटमध्ये फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, उद्योजकांचे मार्गदर्शन मनपाने घ्यावे किंवा अर्थतज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता आणि सर्वसामान्य सोलापूरकरांवर अवास्तव कर न लादता वाढवता येणे सहज शक्य आहे. अर्थसंकल्पावर अभ्यास, पृथ्थकरण आणि समीक्षण होणे आवश्यक आहे. मनपाने सोलापूरकरांवर जकात न लादता, ती मोकळी करावी. त्यामुळे चोर्या कमी होतील. सोलापूरच्या उद्योगवाढीबाबत बोलताना किशोर कटारे म्हणाले की, सोलापूर शहरात लेेबर ओरिएंटेड उद्योग उभारणे आवश्यक आहे. कॉमन इंडस्ट्री सिस्टिम (सीकेटी) असलेल्या उद्योगांमुळे शहराची वेगात प्रगती होते. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. सोलापुरात रोजगार नसल्याने सोलापूरकर सोलापूर सोडून जात आहेत. जगात लोकसंख्या कमी होणारे सोलापूर हे एकमेव शहर असल्याचे नमूद करून किशोर कटारे म्हणाले की, कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे! त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते. महानगरपालिकेने एक बिझनेस कमिटी नेमावी. यात अर्थतज्ञ, उद्योजक, व्यवस्थापनतज्ज्ञ असावेत. मनपाच्या अर्थसंकल्पाचे प्रेझेंटेशन या बिझनेस कमिटीकडून घ्यावे. त्यामुळे विकासयोजनेचा आराखडा तयार करून त्या नियोजनाप्रमाणे काम केल्यास शहरविकास, उद्योगविकास होईल. त्यामुळे मनपाचा महसूल वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. राज्य व केंद्र सरकारची अनुदाने सोलापूर प्रशासन, मनपाने उपयोगात आणावीत. प्रगतीची काही सूत्रे सांगताना कटारे म्हणाले की, प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. कडकपणे धोरणे राबविली पाहिजेत. घर स्वच्छ ठेवले नाही तर पाहुण्यांना कसे बोलावणार? त्यासाठी शहर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यातून अनेक स्रोत निर्माण होतील. कचर्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, पवनऊर्जा प्रकल्प राबविल्यास ‘बँकिंग ऍन्ड विलिंग’ पद्धतीने मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते व वीज वापरता येऊ शकते. जर मनपाला असले प्रकल्प करता येणार नसतील, तर असे प्रकल्प किंवा छोट्या छोट्या गोष्टी जसे, शहरातील दिवाबत्ती आदीचे मेंटेनन्स शहरातील इच्छुक कंपन्यांना द्यावे, त्यामुळे सोलापूरकरांना सोयी उपलब्ध करून देता येऊ शकतील.
.......................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. २४ ऑक्टोबर २०१०
शासनाचा उद्योगाप्रती ‘प्रो-ऍक्टिव्ह ऍप्रोच’ असावा : काशीनाथ ढोले
क्रॉस इंटरनॅशनलच्या ऑईल सील्सवर धावते जग
‘‘क्रॉस इंटरनॅशनल सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे नाव. भारतातल्या ऑटोमोबाईल उद्योगातील ऑईलसील उत्पादनात सीलिंग रिंगसारख्या मोनोपॉली असलेल्या उत्पादनात अग्रमानांकित कंपनी आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ ढोले यांनी आपल्या कंपनीची कलेकलेने, कल्पकतेने आणि अनेक अडचणींना खंबीरपणे तोंड देत प्रगती साधली. त्यांनी कंपनीच्या प्रगतीबरोबरच सोलापूरचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्राच्या जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.’’
...............................................................................................................................
![]() |
| आशीष ढोले मुख्य संचालन अधिकारी, क्रॉस इंटरनॅशनल, सोलापूर. |
क्रॉस इंटरनॅशनल सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे नाव. भारतातल्या ऑटोमोबाईल उद्योगातील ऑईलसील उत्पादनात सीलिंग रिंगसारख्या मोनोपॉली असलेल्या उत्पादनात अग्रमानांकित कंपनी आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ ढोले यांनी आपल्या कंपनीची कलेकलेने, कल्पकतेने आणि अनेक अडचणींना खंबीरपणे तोंड देत प्रगती साधली. त्यांनी कंपनीच्या प्रगतीबरोबरच सोलापूरचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्राच्या जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आज क्रॉस इंटरनॅशनल जगद्विख्यात झाली असताना, आपल्या वडिलांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवीत क्रॉस इंटरनॅशनलची धुरा समर्थपणे वाहणारे नव्या पिढीचे उद्योजक आणि क्रॉस इंटरनॅशनलचे मुख्य संचालन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) आशीष काशीनाथ ढोले सोलापुरातील तरुण उद्योजकांत अग्रस्थानी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
१२ वर्षे नोकरी केल्यानंतर काशीनाथ रेवप्पा ढोले यांनी १९८७ साली क्रॉस इंटरनॅशनलची स्थापना केली. सुरुवातीला सीलिंग रिंग आणि फ्रिक्शन पॅड या दोन उत्पादनांची सुरुवात करून आज अनेक उत्पादनांत क्रॉस इंटरनॅशनलने आघाडी घेतली आहे. त्या काळात टाटा मोटर्स ‘सीलिंग रिंग’ व ‘फ्रिक्शन पॅड’ ही दोन उत्पादने जर्मनीतून आयात करीत होती. सन १९८७ पर्यंत याचे उत्पादन भारतात कोणीही करीत नव्हते. आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानांकनाप्रमाणे ही दोन उत्पादने सुरू करून क्रॉस इंटरनॅशनलने या उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा टाटा मोटर्सला सुरू केला. हळूहळू क्रॉस इंटरनॅशनलचा पसारा वाढू लागला. टाटा मोटर्सनंतर क्रॉस इंटरनॅशनल भारतीय बाजारपेठेत उतरली आणि पाहता पाहता आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांच्या बळावर भारतीय बाजारपेठही काबीज केली. आज भारतातील सीलिंग रिंगची एकूण ९२ टक्के बाजारपेठ क्रॉस इंटरनॅशनलच्या ताब्यात असून, आजही ही उत्पादने आम्ही एकटेच बनवीत असल्याने आमची मोनोपॉली कायम असल्याचे आशीष ढोले यांनी अभिमानाने सांगितले. टाटा मोटर्सनंतर महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, यामाहा, फोर्स मोटार्स, सिमसन ऍन्ड कंपनी(इंग्लंडमधील ट्रॅक्टर इंजिन बनविणारी कंपनी), क्रॉम्पटन ग्रीव्हज, बजाज ऑटो, किर्लोस्कर आदी कंपन्यांना या उत्पादनांची निर्यात अखंडपणे सुरू आहे.चार वर्षांनंतर काशीनाथ ढोले यांनी उद्योगातील यशस्वी पदार्पणानंतर १९९१ साली सनबर्ड प्लास्टिक इंडस्ट्रीज या प्लास्टिक पॅकिंग डिव्हिजची सुरुवात केली. हा उद्योग काशीनाथ ढोले यांच्या सुविद्य पत्नी आणि आशीष ढोले यांच्या मातोश्री सौ. सुनिता ढोले या चालवितात. या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे या उद्योगात १०० टक्के महिलाच काम करतात. महिलांना रोजगाराभिमुख करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने हा उद्योग सुरू केला असल्याचे आशीष ढोले यांनी सांगितले.
१२ वर्षे नोकरी केल्यानंतर काशीनाथ रेवप्पा ढोले यांनी १९८७ साली क्रॉस इंटरनॅशनलची स्थापना केली. सुरुवातीला सीलिंग रिंग आणि फ्रिक्शन पॅड या दोन उत्पादनांची सुरुवात करून आज अनेक उत्पादनांत क्रॉस इंटरनॅशनलने आघाडी घेतली आहे. त्या काळात टाटा मोटर्स ‘सीलिंग रिंग’ व ‘फ्रिक्शन पॅड’ ही दोन उत्पादने जर्मनीतून आयात करीत होती. सन १९८७ पर्यंत याचे उत्पादन भारतात कोणीही करीत नव्हते. आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानांकनाप्रमाणे ही दोन उत्पादने सुरू करून क्रॉस इंटरनॅशनलने या उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा टाटा मोटर्सला सुरू केला. हळूहळू क्रॉस इंटरनॅशनलचा पसारा वाढू लागला. टाटा मोटर्सनंतर क्रॉस इंटरनॅशनल भारतीय बाजारपेठेत उतरली आणि पाहता पाहता आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांच्या बळावर भारतीय बाजारपेठही काबीज केली. आज भारतातील सीलिंग रिंगची एकूण ९२ टक्के बाजारपेठ क्रॉस इंटरनॅशनलच्या ताब्यात असून, आजही ही उत्पादने आम्ही एकटेच बनवीत असल्याने आमची मोनोपॉली कायम असल्याचे आशीष ढोले यांनी अभिमानाने सांगितले. टाटा मोटर्सनंतर महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, यामाहा, फोर्स मोटार्स, सिमसन ऍन्ड कंपनी(इंग्लंडमधील ट्रॅक्टर इंजिन बनविणारी कंपनी), क्रॉम्पटन ग्रीव्हज, बजाज ऑटो, किर्लोस्कर आदी कंपन्यांना या उत्पादनांची निर्यात अखंडपणे सुरू आहे.चार वर्षांनंतर काशीनाथ ढोले यांनी उद्योगातील यशस्वी पदार्पणानंतर १९९१ साली सनबर्ड प्लास्टिक इंडस्ट्रीज या प्लास्टिक पॅकिंग डिव्हिजची सुरुवात केली. हा उद्योग काशीनाथ ढोले यांच्या सुविद्य पत्नी आणि आशीष ढोले यांच्या मातोश्री सौ. सुनिता ढोले या चालवितात. या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे या उद्योगात १०० टक्के महिलाच काम करतात. महिलांना रोजगाराभिमुख करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने हा उद्योग सुरू केला असल्याचे आशीष ढोले यांनी सांगितले.१९९८ मध्ये क्रॉस पॉलिमर्स हा रबर बेस्ड ऑईलसील उत्पादनाचा तिसरा प्रकल्प सुरू केला. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑईलसील्स बनवली जातात. येत्यावर्षी चिंचोळी एमआयडीसी येथे नवा प्रकल्प सुरू करीत असल्याचे सांगून अशीष ढोले म्हणाले की, या प्रकल्पातून एप्रिल २०११ पासून उत्पादनाला सुरुवात होईल. येथे ‘पीटीएफई’ अर्थात पॉलिटेट्रा फ्लोरो इथिलीन हे आधुनिक पद्धतीचे ऑईलसील उत्पादित केले जाणार आहे. या प्रकल्पात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे २१ व्या शतकातील जगातील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान असेल. तसेच आणखी काही मोनोपॉली असलेली उत्पादने काही मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने सुरू करण्याचाही विचार असल्याचे ढोले यांनी सांगितले. क्रॉस इंटरनॅशनलमधून ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतिक दर्जाची एकूण सात उत्पादने घेतली जातात. यात क्रँकशाफ्ट सील, ऑईलसील, ओ-रिंग, स्पेशल पीटीएफई सील्स, कॅसेट टाईप सील्स, वॉल्व्ह स्टॅम्प सील्स आणि गॅसकेट आदी उत्पादनांचा समावेश आहे. महिन्याला साधारणपणे साडेपाच लाख ऑईल सील्सची विक्रमी विक्री होतेे. क्रॉस इंटरनॅशनलची उत्पादने युरोप, दक्षिणपूर्व अशिया, लॅटीन अमेरिका आणि आफ्रिका आदी देशांत निर्यात केली जातात.कंपनीची मागील वर्षाची उलाढाल २५ कोटी रुपये होती, तर यावर्षी ३५ कोटींपर्यंत उलाढाल अपेक्षित आहे. क्रॉस इंटरनॅशनल लवकरच हेड गॅसकेटचे उत्पादन देखील सुरू करणार आहे. ‘इंजिन बेस्ड सीलिंग मटेरियल’ हे अतिशय नाजूक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याला ‘व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट’ म्हटले जाते. क्रॉस इंटरनॅशनलच्या ‘ड्रिव्हन बाय इनोव्हेशन’ या घोषवाक्याला साजेशा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड उत्पादने देण्यावर भर राहिला आहे, त्यामुळे पर्यायाने संशोधनावर विशेष भर दिला जातो. आमचा संशोधन आणि विकास (आर. ऍन्ड डी.) विभाग अतिशय प्रबळ असून, या विभागात उत्पादनाची गुणवत्ता, दर्जा, कमी किंमत आणि उत्पादन क्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाते.
सध्या सर्व जगाचे लक्ष भारताकडे असल्याचे सांगून आशीष ढोले म्हणाले की, ऑटोमोबाईल उत्पादनांच्या क्षेत्रात भारताला प्रचंड संधी आहेत. सर्व साधनांची उपलब्धता भारतातच आहे, केवळ १० ते १५ टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. त्यामुळेच भविष्यात भारताशी अन्य कोणीही स्पर्धक देश निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. उद्योगात भारतीयांना दिलेले वचन, नियम पाळण्याची सवय नाही. परदेशी कंपन्या आपल्या भारतात येऊ लागल्या व आपल्याशीच स्पर्धा करू लागल्या. आपल्या भारतातील पैसा त्यांच्या देशात नेऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय पैसा परदेशाकडे वळत आहे. केवळ या दोषांमुळे मागे पडण्याची भीती होती, पण परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आता भारतीय लोक आणि भारतीय कंपन्यादेखील हळूहळू ही तत्त्वे पाळू लागल्या आहेत. कमिटमेंंट म्हणजे दिलेला शब्द पाळणे आणि ओव्हर कमिटमेंट, जसे अवास्तव किंवा आपल्या क्षमतेबाहेर शब्द देणे हे प्रकार कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे आता यात चांगली सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे, पण हा सुधारणेचा वेग वाढणे आवश्यक आहे.
सध्या सर्व जगाचे लक्ष भारताकडे असल्याचे सांगून आशीष ढोले म्हणाले की, ऑटोमोबाईल उत्पादनांच्या क्षेत्रात भारताला प्रचंड संधी आहेत. सर्व साधनांची उपलब्धता भारतातच आहे, केवळ १० ते १५ टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. त्यामुळेच भविष्यात भारताशी अन्य कोणीही स्पर्धक देश निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. उद्योगात भारतीयांना दिलेले वचन, नियम पाळण्याची सवय नाही. परदेशी कंपन्या आपल्या भारतात येऊ लागल्या व आपल्याशीच स्पर्धा करू लागल्या. आपल्या भारतातील पैसा त्यांच्या देशात नेऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय पैसा परदेशाकडे वळत आहे. केवळ या दोषांमुळे मागे पडण्याची भीती होती, पण परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आता भारतीय लोक आणि भारतीय कंपन्यादेखील हळूहळू ही तत्त्वे पाळू लागल्या आहेत. कमिटमेंंट म्हणजे दिलेला शब्द पाळणे आणि ओव्हर कमिटमेंट, जसे अवास्तव किंवा आपल्या क्षमतेबाहेर शब्द देणे हे प्रकार कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे आता यात चांगली सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे, पण हा सुधारणेचा वेग वाढणे आवश्यक आहे.क्रॉस इंटरनॅशनलला आयएओ/ टीएस : १६९४९-२००२ चे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच हॉलंड येथील बीव्हीक्यूआयचे मानांकन देखील प्राप्त झाले आहे. लवकरच आयएसओ : १४००१ चे मानांकन देखील मिळेल. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे ‘झीरो पीपीएम’ रिजेक्शन म्हणजे ‘पार्टस् पर मिलियन’ रिजेक्शन आहे. तसेच कंपनीने आणखी एक विक्रम केलेला आहे, तो म्हणजे गेल्या १० वर्षांत ग्राहकांची तक्रारही शून्य आहे. क्रॉस इंटरनॅशनलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, कंपनीच्या नव्या संशोधनांची, उत्पादनांची दखल अनेकदा घेतली आहे.
..............................................................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास : काशीनाथ ढोले
![]() |
| काशीनाथ ढोले व्यवस्थापकीय संचालक, क्रॉस इंटरनॅशनल, सोलापूर. |
मुंबई, पुण्याच्या तुलनेत सोलापूरचा कामगार अतिशय हुशार व उत्तम आहे. कामगार हा उद्योगाच्या भरभराटीचा कणा असल्याचे सांगून क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ ढोले म्हणाले की, मी कामगारांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करतो. त्यांचे चरित्र, कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न आणि तसे उपक्रम सतत सुरू असतात. त्यातून खूप काही चांगले निष्पन्न झाले असून, शिस्त, स्वच्छता, कामाप्रति निष्ठा, आत्मसंयमन आणि प्रत्यक्ष कार्यक्षमता वाढली असल्याचे काशीनाथ ढोले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.सोलापूरच्या विकासाबद्दल बोलताना काशीनाथ ढोले म्हणाले की, सोलापूर खूप अनुकूल आहे. सोलापुरात जमिनीच्या किमती कमी आहेत. एमआयडीसीत पाण्याची सोय चांगली आहे. ऍफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँटची सोय असल्याने पर्यावरणाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. कामगार चांगला आणि सोलापूरकर सोशिक व समजुतदार आहे, पण याबरोबरच सरकार, एमआयडीसी आणि महानगरपालिका यांचे पाठबळ व सहकार्य उद्योजकांना मिळत नाही. प्रशासकीय यंत्रणा अतिशय सावकाश चालते, दिरंगाई टाळून प्रशासकीय कामांचा वेग वाढणे आवश्यक आहे. शासनाकडून सहा सहा महिने पत्रांना उत्तरे देखील मिळत नाहीत, हे उद्योग आणि प्रगतीला घातक आहे! यावर यांना जाब विचारणारे कोणीच नाही का, असा प्रश्न ढोले यांनी उपस्थित केला. जकात नाक्यावर विनाकारण अडवणूक होते. तेथे तज्ज्ञ व्यक्ती असणे आवश्यक आहे. महापालिकेमुळे सहकार्याऐवजी अडथळाच निर्माण केला जातो. उद्योजकांच्या किमान गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे घेऊन देखील कामे करीत नाहीत आणि हे अधोगतीला निमंत्रण आहे! उद्योग वाढल्याने सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल वाढणार आहे. असा महसूल मिळणार असतानासुद्धा उद्योजकांना एमआयडीसी व सरकारकडून मूलभूत सुविधा देखील दिल्या जात नाहीत. एमआयडीसीतील लँड डिस्ट्रिब्यूशन करताना सध्या असलेल्या उद्योजकांना एक्स्पान्शनसाठी सहकार्य मिळणे गरजेचे आहे. शासनाचा, मनपाचा आणि एमआयडीसीचा ‘प्रो-ऍक्टिव्ह ऍप्रोच’ असणे आवश्यक आहे. कामगारांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, कायदेविषयक मार्गदर्शन, कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे एमआयडीसी व चेंबर ऑफ कॉमर्सने घ्यावीत. आपल्या राजकीय नेत्यांत इच्छाशक्तीच नाही, केवळ एकमेकांत भांडत बसतात ! नव्याने उद्योग क्षेत्रात उतरू इच्छिणार्यांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्ला देताना काशीनाथ ढोले म्हणतात की, इनोव्हेटीव्ह व टेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट्स असणे अपरिहार्य असून, नवख्यांना याद्वारे लवकर प्रस्थापित होता येणे शक्य आहे. अन्यथा आजच्या स्पर्धेच्या काळात उद्योग स्थिर होण्याला खूप वेळ लागतो.राजकीय सुधारणा झाली तरच देशाची प्रगती वेगात होईल. भारत चीनपेक्षाही सक्षम आहे, उत्पादनांचा दर्जा चीनपेक्षा चांगला आहे. चीनला शह देण्यासाठी हीच योग्य संधी व वेळ आहे, पण भारतीयांबद्दल आंतरराष्ट्रीय जगतात ही तक्रार आहे की, भारतीय दिलेला शब्द पाळत नाही. हे थांबले तरच आपण २०२० पर्यंत महासत्ता होऊ शकू!
........................................................................................................................................महिला जास्त सक्षम : सुनिता ढोले
महिला सक्षमीकरणाविषयी सुनिता ढोले म्हणतात की, क्रॉसच्या सनबर्ड प्लास्टिक इंडस्ट्रीत काम करणार्या महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य, विशेष प्रशिक्षण, समुपदेशन करतो आणि मनोरंजनासाठी सहली देखील काढतो. महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्षम असल्याचे सांगून सुनिता ढोले म्हणाल्या की, महिला अतिशय कामसू, जास्त सुपिरिअर आणि सहकाराच्या भावनेने काम करतात. त्यांच्या कामात उत्पादनक्षमता जास्त असते. आमच्या येथे काम करणार्या महिला कौटुंबिक वातावरणामुळे अतिशय समाधानी आहेत. त्यांंच्या अडचणी सोडवल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहण्याचे समाधान वेगळेच असल्याचे सुनिता ढोले म्हणाल्या. नव्या महिला उद्योजिकांना पुढे येण्याच्या दृष्टीने घरातून पाठबळ हवे. महिला बदल लवकर स्वीकारत असल्याने बदल तत्काळ अमलात आणता येऊ शकतात.
..........................................................................................................................दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि. १० ऑक्टोबर २०१०
इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूरला सोन्याचे दिवस येतील : माजी खा. सुभाष देशमुख
लोकमंगल बायोटेक : कृषकांचा सखा, वसुंधरेचा दास
सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्या उद्योजकाला राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. ‘‘जकातीमुळे उद्योजकांची गळचेपी होत असल्याने जकात तत्काळ हटवून एकच करप्रणाली स्वीकारणे आवश्यक आहे. करेरा उद्योग सोलापुरात आलाच नाही, पण १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली. आता ही जागा मोकळी झाली आहे. त्या जागा गरजूंना तत्काळ द्याव्यात. शहराचा विकास खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले तर सोलापूरला देऊ, अशी दुजाभावाची वागणूक शासनाने सोलापूरला दिली. त्यामुळे सोलापूरकर नाईलाजाने सोलापूर सोडून जातोय आणि हे सर्व हे थांबले पाहिजे !‘‘
.....................................................................................................
लोकमंगल बायोटेक प्रा. लि.ला पाहता पाहता आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार वर्षांत लोकमंगल बायोटेकने मारलेली ही उद्योग भरारी केवळ स्पृहणीयच नव्हे तर स्तिमित करणारीच म्हणावी लागेल! सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांच्या उद्योगकुशलतेचे हे आणखी एक उदाहरण. लोकमंगल उद्योग समूहाचे सर्वच प्रकल्प सुभाषबापूंच्या ब्रीदाप्रमाणे ‘अखंड गतीतून सार्थकता’ याची मूर्तिमंत रूपं आहेत, पण या ब्रीदाला काहींसा फाटा देत केवळ चारच वर्षांत मारलेली ही उत्तुंग भरारी म्हणजे लोकमंगलच्या कासवाने घेतलेली उल्लेखनीय गरुडझेपच होय!लोकमंगल बायोटेकच्या या प्रगतीत सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करणारे लोकमंगल बायोटेक प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख म्हणजे कामसू वृत्तीचे जिवंत उदाहरण आहेत.
अखंड कामात गुंतलेले आणि लोकमंगल म्हणजे सर्वस्व मानणार्या गणेश देशमुखांच्या कौशल्याचा लोकमंगलच्या या देदीप्यमान प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकमंगल बायोटेकला योग्य दिशा देणार्या कार्यकुशल व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी ‘तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला.लोकमंगल बायोटेकचा २००६ साली सेंद्रीय खतउत्पादनाने उद्योगाचा श्रीगणेशा केला. लोकमंगल बायोटेकने ८५ उत्पादने विकसित केली आहेत. सोलापूर, अकोला, जळगाव, वडोदरा, उदयपूर आदी ठिकाणी उत्पादन होत असून, लोकमंगल बायोटेकच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या ७ राज्यांत शाखा आहेत. विदर्भ, मराठवाड्यात लोकमंगलच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याचे गणेश देशमुख म्हणाले.![]() | |||
गणेश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, लोकमंगल बायोटेक |
सुभाषबापूंची दूरदृष्टी, दमदार उत्पादने, नेटके वितरण, विनम्र व तत्पर सेवेच्या बळावरच लोकमंगलने ही भरारी घेतली आहे.नावाप्रमाणेच ‘मॅग्नेट’ असलेल्या दुय्यम अन्नघटकांचा समावेश असणार्या खतांची निर्मिती केली. या उत्पादनांवर कृषकवर्ग संतुष्ट असून, त्यांना ‘मॅग्नेट’ने आपल्याकडे खेचून घेतले आहे. भरघोस व दर्जेदार उत्पादनांसाठी मॅग्नेट, सरदार, स्पार्क, फास्टर, परफेक्ट आणि लान्सर ही शेतकर्यांच्या पसंतीस उतरलेली उत्पादने आहेत. या खतांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्यात विरघळणारी खते, फवारणीद्वारे दिली जाणारी खते, मुख्य अन्नघटक खते आदी सर्वच वर्गवार्यांची उत्पादने लोकमंगलने विकसित केली आहेत. जोमदार पिकांसाठी सशक्त बियाणांची गरज लक्षात घेऊन लोकमंगल बायोटेकने हीरो नं. १ ही तांदळाची नवी जात संशोधित केली. मका - विराट ५५५, सूर्यफूल - भास्कर ९९, बाजरी - विश्वास, सोयाबीन - जेएस ३३५, संकरित ज्वारी - भागिरथी याशिवाय बसंती ११, देवा ८१, भीमा १०८, विपुल गोल्ड, शिव, श्रुती, आर्या, कामिनी, मेघदूत, विशाखा, द्रोण, नेत्र, रॅम्बो, हर्षदा, नंदिनी, इंद्रायणी, लोकमंगल आणि शंभू आदींसह विविध फळभाज्यांची बियाणे देिीखल संशोधित केली आहेत. शेतकर्यांना मिळणारी बियाणे १०० टक्के उगवणूक असणारी, सशक्त, निरोगी, किटाणू व रोगमुक्त पीक मिळावे म्हणूनलोकमंगल बायोटेक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आवर्जून गणेश देशुमख यांनी सांगितले. बियाणांबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, शेतातील काडीकचरा व शेण यांचा विनियोग करून त्यापासून सेंद्रीय खत बनवण्यासाठी कुजवणारे रसायन तयार केले आहे.पिकांचे विविध रोगांपासून व किडीपासून संरक्षण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लोकमंगल बायेटेकने अनेक औषधेतयार केली आहेत. निसर्गाला कोणतीही हानी न पोचविता किडींचा व रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी जैविक कीड व बुरशीनाशकेही निर्माण केली आहेत. तसेच यावर्षी लोकमंगल बायोटेकने नवीन जैविक कीटकनाशके संशोधित केली असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, सर्व प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी ‘ऍक्शन’ हे जैविक कीटकनाशक तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रस शोषणार्या किडींच्या नायनाटासाठी ‘बेन - १०’ ही दोन प्रभावी जैविक कीटकनाशके विकसित केली असून, ती शेतकर्यांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याचे समाधान गणेश देशमुख यांनी व्यक्त केले. लोकमंगलने या संशोधन कार्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा उभी केली आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरीत नवनवी उत्पादने विकसित करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक लोकमंगलकडे उपलब्ध आहेत.बाजाराची स्थिती कशीही असली तरीही लोकमंगल बायोटेकचे भाव स्थिरच असतात व कोणाकडूनही, कोणत्याही उत्पादनांची काळ्या बाजारात विक्री होणार नाही, याची विशेष काळजी घेत असल्याचे गणेश देशमुख यांनी सांगितले. स्वत:चा फायदा किती, यापेक्षा शेतकर्याला किती फायदा झाला? याकडे सुभाष देशमुख यांचा कटाक्ष असतो.
पहिल्याच वर्षी म्हणजे सन २००६ साली लोकमंगलने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. तर मागील वर्ष सन २००९-१० ला लोकमंगल बायोटेकने उद्योगविकासाची मोठी गरुड भरारी घेत ही उलाढाल २२ कोटींवर पोहोचवली आहे. या वर्षात ४५ ते ५० कोटींचे उद्दिष्ट असून, २०१५ पर्यंत आम्ही ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करू असा आत्मविश्वास गणेश देशमुख यांनी व्यक्त केला. लोकमंगल बायोटेकमध्ये ४०० लोक काम करतात. शिवाय लोकमंगल बायोटेकमुळे निर्माण होणारा अप्रत्यक्ष रोजगार देखील मोठाच आहे. लवकरच कीटकनाशके आणि ठिबक सिंचनातून दिली जाणारी खते विकसित करीत असून, ही उत्पादने लवकरच ती शेतकर्यांच्या सेवेत आणली जात आहेत.लोकमंगल बायोटेक आता शेअर बाजारात आयपीओ रजिस्ट्रेशन करणार आहे. तसेच ऍक्शन व बेन १० ही उत्पादने निर्यात करण्याचा मानस असून, तो लवकरच पूर्ण हाईल, अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर लोकमंगलचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आमची उत्पादने आता जागतिक कृषिप्रदर्शनात दाखल झालेली आहेत. फ्रान्स, चीन, सॅनफ्रान्सिस्को आदी ठिकाणी झालेल्या कृषिप्रदर्शनात आम्ही सहभाग नोंदवला आहे. तेथील तज्ञांनी आमच्या उत्पादनांची वाखाणणी केल्यामुळे आता जागतिक स्तरावर लोकमंगल नक्कीच आपले स्थान निर्माण करेल. शेतकर्यांना प्रेरित करून या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करीत तिला सृष्टीसौंदर्याने नटवण्यासाठी, हिरवळ वाढवण्यासाठी लोकमंगल परिवार प्रयत्नशील आहे. सृष्टिदेवतेच्या ऋणातून आपण मुक्त होणे शक्य नाही, पण या प्रदूषित झालेल्या सृष्टीवर थोडा जरी बहर आणण्यात आम्ही यशस्वी झालो तरी धन्य होऊ! असा आशावादही देशमुख यांनी व्यक्त केला.
.................................................................................................................................. •सोलापूरचा औद्योगिक विकास - माजी खासदार सुभाष देशमुख
![]() | ||
माजी खासदार सुभाष देशमुख, संस्थापक अध्यक्ष, लोकमंगल समूह, सोलापूर |
सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ते सतत प्रयत्न करीत आहेत. अशा उद्यमशील माजी खासदार व लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख यांनी दै. तरुण भारतशी संवाद साधला. सोलापूरच्या विकासाबद्दल पोटतिडकीने बोलताना सुभाषबापू म्हणतात, ‘‘जर माझ्या स्वप्नाप्रमाणे सोलापुरात तयार होणारे १ हजार सोलापूरकर उद्योजक आणि त्याबरोबरच बाहेरील उद्योजक आले आणि स्थिरावले तर मुंबई-पुण्याकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. कारण ही तरुण पिढी सोलापूरचे भविष्य आहे आणि हीच तरुण पिढी जर सोलापूर सोडू लागली तर या शहराचे भवितव्य काय राहील, याचा सर्वच सोलापूरकरांनी विशेषत: राजकीय नेत्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठाचा दर्जा सुधारणे, जे विषय इतरत्र नाहीत असे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठे शहराचे भविष्य घडवतात. हा मंत्र लक्षात घेऊन विषयातील वेगळेपण, दर्जा सुधारण्याला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. सोलापूरच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. उद्योजकांना मूलभूत सुविधा जसे की, बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूर, मुंबई-हैदराबाद आदी रेल्वेमार्गांची डबल लाईन आणि विद्युतीकरण करणे, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते या सुविधा उद्योजकांना अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे. सोलापुरात येऊ इच्छिणार्या उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्या उद्योजकांना राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. करेरा उद्योग तर सोलापुरात आलाच नाही, पण गेली १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली, आता ही जागा मोकळी झाली आहे, पण त्या जागेचे वितरण गरजू उद्योजकांना तात्काळ होणे आवश्यक आहे. सोलापूर व जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्वर, अक्कलकोट स्वामी समर्थ, संत दामाजी, संत सावता माळी, वडवळचे नागनाथ मंदिर, करमाळ्याची कमलादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी ९ तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते, त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसिक करणे अत्यावश्यक आहे. चारपदरी रस्ते व इतर अनेक विकासकामे खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले सुरले तर सोलापूरला देऊ, तेही मिळेल तेव्हा मिळेल, अशी दुजाभावाची वागणूक शासनकर्त्यांनी सोलापूरला दिली आहे. सकारात्मक भूमिका घेत सोलापूरचा अपप्रचार थांबवून शहराचा व सोलापूरकरांचा विधायक प्रचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरकर असुविधांमुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने सोलापूर सोडून पुण्या, मुंबईला जात आहेत, हे थांबले पाहिजे. चांगली चाललेली असतानाही शताब्दी एक्स्प्रेस का बंद केली? तर डीआरएम म्हणतात की, जागा नाही. तर मग जेव्हा चालू होती तेव्हा जागा होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. तर यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ तोडगा काढून शताब्दी पुन्हा सुरू करावी. सोलापूर हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बहुधा भ्रष्टाचारात सोलापूर अग्रक्रमावर असावे. अशी शासनाची वाईट स्थिती असताना भ्रष्ट वातावरणात सोलापूरची प्रगती कशी होणार? उद्योगाबाबत सोलापुरात सर्वात जास्त पूरकता आहे ती कृषी क्षेत्राला. कृषीच नव्हे तर सर्वच बाबतीत सोलापूर पूरक आहे. प्रगतीला प्रचंड वाव आहे, पण हे सर्व होईल फक्त कृतीतूनच. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच सोलापूरला सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
........................................................................................................................................ दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि.०३ ऑक्टोबर २०१०
पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण : शरदकृष्ण ठाकरे
एलएचपी : एकविसाव्या शतकातील भगिरथ
शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्याना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागवणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
......................................................................................................
लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. अर्थात एलएचपीची सुरुवात केवळ १५ हजार रुपयांच्या भांडवलावर १५०० चौरस मीटरच्या भाड्याने घेतलेल्या एक पत्र्याच्या शेडमध्ये झाली. तेव्हा पहिले उत्पादन होते मोनोब्लॉक पंप. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधक वृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. सोलापूरच्या उद्योग क्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरविणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्यांना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागविणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी ‘दै. तरुण भारत’शी दिलखुलास संवाद साधताना सांगितले की, आजची एलएचपी तिच्या जन्मापूर्वीच माझ्या स्वप्नात होती. ती कालांतराने कष्ट आणि ध्यासातून प्रकट झाली. पहिल्यांदा पत्र्यांचे शेड, त्यानंतर होटगी मार्गावरील औद्योगिक वसाहत, अशी मार्गक्रमणा करीत २००२ साली चिंचोळी एमआयडीसी स्थलांतरित झाली आणि आज जगद्विख्यात मानांकन प्राप्त अशा भव्य प्रकल्पात साकारली गेली.धुळे जिल्ह्यातील ‘मोराणे’सारख्या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले शरदकृष्ण ठाकरे यांचे वडील प्रयोगशील, जिज्ञासू शेतकरी व व्यायामप्रिय सद्गृहस्थ होते. त्यांनी नापीक जमिनीचे नंदनवन करून पिके काढली; त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. १९५२ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हरितक्रांतीला प्रत्यक्ष भेट देऊन प्रशंसा केली होती. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मातोश्री तर वात्सल्यमूर्तीच होत्या. त्यांनी माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही तितकेच प्रेम केले. आई-वडिलांना माणसांची जाण होती. त्यांनी जोडलेली माणसे कधीच तोडली नाहीत.
शरदकृष्ण ठाकरे यांचे चार ज्येष्ठ बंधू उच्चविद्याविभूषित आहेत. बालपणापासून शरदकृष्ण ठाकरे यांना इंजिनीअर होण्याची प्रबळ इच्छा होती. नांगरापासून शेतीपंपांपर्यंत सर्व शेती अवजारे बिघडली की, दुरुस्तीची धडपड सुरू असायची. योगायोगाने पुढे मी प्रॉडक्ट निवडले तो पंपच. बालपणाच्या शेतीमैत्रीची ही परतफेडच म्हणायला हरकत नाही! हे शरदकृष्ण ठाकरे कृतज्ञतापूर्वक सांगतात.आर. अँड डी. व प्रॉडक्ट डिझायनिंगचे महत्त्व पुरेपूर जाणून असल्याने एलएचपीने सर्वात जास्त भर दिला तो ‘संशोधन व विकास कार्यावर.’ याच जोरावर आज आम्ही जवळ जवळ साडेचार हजार उत्पादने संशोधित करू शकलो आणि हेच एलएचपीच्या यशाचे मूळ कारण असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितले. एलएचपीचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब पाटील यांनी उत्तम विक्रीपश्चात सेवेच्या बळावर ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अण्णासाहेबांच्या सोबत शेतकर्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या गरजा व अडचणी समजावून घेतल्याने त्याचा संशोधनात खूप उपयोग झाल्याचे ठाकरे म्हणाले. शासकीय निविदांतर्गत पुरविलेले पंप गरीब शेतकर्यांना आणि विशेषत: अदिवासींना दिले जात असल्याने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर, कधीकधी आर्थिक झळ सोसूनही एलएचपीने या माध्यमातूनही सामाजिक कार्य केल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी नम्रपूर्वक सांगितले. आजचे जग हे स्वयंचलित यंत्रांचे. त्यामुळे मोटारशिवाय स्वयंचलित यंत्र नाही आणि यंत्राविना उद्योग नाही, हे मर्म जाणून १९८८ मध्ये ‘इंडक्शन मोटार’ उत्पादनाकडे वळलो. ध्येयावर नजर ठेवीत आत्मविश्वासपूर्वक वाटचाल सुरू केली.‘ड्रिव्हन बाय एक्सलन्स’ हे ब्रीद स्वीकारलेल्या एलएचपीची सर्वच उत्पादने ग्राहकांच्या मागण्यांना केंद्रबिंदू मानून दर्जा नियंत्रणाच्या कसोटीतून तावून -सुलाखून काढलेली आहेत. नवतंत्राच्या अभ्यासासाठी अनेक देशांत जाऊन अभ्यास केल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, अशा परदेश दौर्यात नवनवीन व्यवस्थापकीय तंत्रे, जसे की सिक्स सिग्मा, टीपीएम, फाईव्ह एस, एसक्यूसी, कानबान यांचा अभ्यास केल्यानंतर अशरश: परिस सापडल्याचा आनंद झाला. या संकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करीत या पद्धती एलएचपीमध्ये रुजविल्या. त्यामुळे आयएसओ ९००० आयएसओ ९००१ हे मानांकन प्राप्त झाले.
या प्रगतीत कंपनीच्या सर्व लहान-मोठ्या कर्मचार्यांचे मोठे योगदान आहे. सान्निध्यात येणार्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेण्याचे तत्त्व काळजीपूर्वकरीत्या जपले आहे. कामगारांच्या योगदानाबरोबरच सोलापुरातील नामवंत घराणे लक्ष्मी उद्योग समूहाचेे पाटील कुटुंबीय, अण्णासाहेब पाटील, डॉ. राजाभाऊ होशिंग, मोहन गांधी आदी वडीलधारी मंडळी, सोलापूर जनता सह. बँकने दिलेले अर्थसहाय्य, आर्किटेक्ट दिलीप पागे, अर्जुन घोडके, लक्ष्मीनारायण शेराल, कामगार नेते बोरोटीकर मास्तर आदी अनेक सहकार्य करणार्यांचा शरदजी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. आज महिन्याला १२ हजार उत्पादने उत्पादित करण्याची क्षमता एलएचपीने गाठली आहे. पहिल्यावर्षी ७ लाखांची उलाढाल करणारी एलएचपी आज १३० कोटींवर पोहोचली आहे. ४५०० अमूल्य असे ग्राहक असलेल्या या कंपनीकडे ५००० च्यावर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत. एलएचपीचा वर्षिक विकासदर ५० टक्के असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे यांनी २०१२ पर्यंत २५० कोटींचे उद्दिष्ट पार करून २०१५ पर्यंत ५०० कोटींपर्यंतची मजल मारू! असा विश्वास व्यक्त केला. एलएचपीला १९८५ साली महाराष्ट्र शासनाने लघुउद्योगातील सर्वोत्तम म्हणून गौरविले, तर १९९७ ला भारत सरकारच्या राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारानेसन्मानित केले होते. १९९५ साली आयएसओ ९०००, ९००१ हे मानांकन प्राप्त झाले. सन २००२ साली केंद्र सरकारने पुन्हा एकदा गुणवत्ता पुरस्कार एलएचपीला बहाल केला. बर्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एलएचपीने आपली उत्पादने त्यांच्या ब्रँडनेमने बनवावीत, असा प्रस्ताव ठेवला होता, पण जागतिक दर्जावर आपले नाव कोरण्याचा ध्यास बाळगला असल्याने त्यास नकार दिला असल्याचे ठाकरे म्हणाले.ंसोलापूरच्या उद्योग विकासाचा कानमंत्र देताना शरदकृष्ण ठाकरे म्हणतात, ग्राहकांचे महत्त्व कायम ध्यानात ठेवा. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण त्याने गुणवत्ता वाढते. जगातिकीकरणाचा फायदा घेत निर्यातीवर भर द्या. सचोटी, शिस्त, संशोधन आणि निष्ठेची कास धरा आणि पहा यश आपलेच आहे. शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितलेला हा कानमंत्र सोलापूरच्या प्रत्येक उदयोन्मुख उद्योजकाला मार्गदर्शक ठरेल याबद्दल दुमत नाही.•सोलापूरचा औद्योगिक विकास - शरदकृष्ण ठाकरे
![]() |
| शरदकृष्ण ठाकरे व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. |
येती ५ वर्षे सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भारतातीलच नव्हे तर, परदेशातील उद्योजक सोलापुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी येत्या ६ महिन्यांत मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. ज्यामुळे सोलापुरात येऊ इच्छिणार्या उद्योजकांसाठी आश्वासक वातावरण निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन शरदकृष्ण ठाकरे यांनी केले. मोठ्या उद्योगांची वाहतूक देखील मोठीच असते, त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण ६ महिन्यांत होणे नितांत गरजेचे आहे. बंद पडलेली हवाई वाहतूकसेवा सुरू केली जावी. तसेच शताब्दी एक्स्प्रेस ही रेल्वे पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे ठरते. कारण शताब्दी एक्स्प्रेस जेव्हा सुरू होती, तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांचे लोक सोलापूरला येऊ लागले होते, पण शताब्दी बंद झाल्याने या लोकांचा सोलापूरला येण्याचा ओघ थांबला आहे आणि हे सोलापूरच्या विकासाला खीळ बसणारे असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण आहे! शहरात मूलभूत सोयी-सुविधां जसे की, शुद्ध पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, शिस्तबद्ध वाहतूक आदींची पूर्तता झाली तर, मॅनेजमेंट किंवा प्रथम दर्जाचा अधिकारीवर्ग ज्याला आपण ‘स्किल्ड मॅन पॉवर’ म्हणतो, तो वर्ग येणे सुरू होईल. त्यामुळे स्किल्ड मॅन पॉवरचा प्रश्न सुटेल, शिवाय यामुळे सोलापूरच्या उत्पादनांचा दर्जा व क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सोलापूरच्या मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्याने आज हा वर्ग येथे येण्यास उत्सुक नाही. राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूरकर विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिले आहेत. अनेक वर्षांपासून जकातीचा प्रश्न सतावत आहे. घेतलेल्या जकातीचा ९० टक्के परतावा देखील महापालिकेकडून मिळत नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्पर्धात्मक किमती ठेवण्यात जकातीचा मोठा अडसर असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, ‘जकात रद्द केली जावी म्हणून मी अनेक प्रयत्न केले आहेत. शासन, लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, तरीही जकात हटलेली नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून एलएचपीचा प्रकल्प १४ डिसेंबर २००५ रोजी चिंचोळी एमआयडीसी येथे हलविणे भाग पडले, पण हे सर्वच उद्योजकांना करणे शक्य नाही, त्यामुळे सोलापूरच्या उद्योगवाढीला जकातीमुळे खीळ बसत असल्याने शासनकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा. सोलापूरचा कामगारवर्ग हा अतिशय पापभीरू असून, कार्यक्षम, संयमी आहे, पण सोलापूरच्या कामगारांबद्दल सतत चुकीचा प्रचार केला गेला आहे. वस्तुत: मालक किंवा व्यवस्थापनाच्या चुकांचे खापर कामगारवर्गावर फोडले गेले. सोलापुरात जर दर्जेदार वाहतूक व्यवस्था, रुंद रस्ते, स्वच्छ, मुबलक व किफायतशीर दरात पाणी आणि वीज पुरवली, तर सोलापूर हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून बिरूद मिरवेल, यात शंकाच नाही!.
...............................................................................................उद्योगातील नवी पिढी : आदित्य शरदकृष्ण ठाकरे
![]() |
| आदित्य शरदकृष्ण ठाकरे |
‘जगतिक दर्जाच्या दृष्टीने फॅक्टरी ऍटोमेशन करणे अपरिहार्य आहे’, हे मत आहे शरदकृष्ण ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य शरदकृष्ण ठाकरे यांचे. आदित्य शरदकृष्ण ठाकरे हे उद्योगक्षेत्रात उतरलेले असून, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून एलएचपीच्या विकासाला वेग देण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी ‘गिअरबेस्ड् मोटार्स, पीएमबीसी मोटार्सचे उत्पादन सुरू केलेले आहे. नव्या पिढीतील उद्योजक आदित्य म्हणतात की, माहिती -तंत्रज्ञानाच्या काळात दर्जेदार उत्पादनांबरोबरच व्यावसायिकताही महत्त्वाची आहे. उत्पादनक्षमता सुधारणे आणि पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. उत्पादनाचा दर्जा व क्षमता वाढविण्यासाठी नवनव्या सॉफ्टवेअर्सचा वापर ही काळाची गरज आहे. एलएचपीमध्ये ‘सॅप’ प्रोग्रामिंगचा वापर सुरू केल्याचे सांगून आदित्य म्हणाले की, यामुळे प्रॉडक्टीव्हिटी व दर्जा सुधारला व रिजेक्शन प्रमाण ०.४ टक्क्यांपेक्षाही कमी झाले.
....................................................................................................................................दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी. रविवार, दि. २६ सप्टेंबर २०१०
पुढील पाच वर्षांत सोलापूरचा विकास तीव्र गतीने होणार : डी. राम रेड्डी
बालाजी अमाईन्सची विक्रमी गरुडभरारी
औद्योगिक : अमर पुराणिक
औद्योगिक : अमर पुराणिक
स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन हे स्वत:च्या संशोधन व विकास विभागामधून बाहेर पडलेले आहे. यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा देण्यात आलेला आहे. साधारणपणे जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो. दर्जेदार व संशोधित उत्पादनांमुळे जागतिक स्थरावर बालाजी अमाईन्सला मोठा दर्जा लाभला आहे. बालाजी अमाईन्सच्या या योगदानामुळे भारताबरोबच सोलापूरच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता बालाजी अमाईन्स ‘बालाजी सरोवर पोर्टिको’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत हॉटेल उद्योगात पदार्पण करीत आहे.
.................................................................................................................................
![]() |
| ए. प्रताप रेड्डी कार्यकारी संचालक |
![]() |
| डी. राम रेड्डी संचालक |
![]() |
| एन. राजेश्वर रेड्डी संचालक |
स्वदेशी तंत्रज्ञान : अमाईन्स हे रासायनिक उत्पादन तयार करणार्या जगात दोनच कंपन्या अमेरिका व जर्मनी येथे आहेत. अमाईन्ससारख्या गुंतागुंतीच्या रसायन उत्पादनासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव व जगातील पहिली कंपनी आहे. १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करणार्या बालाजी अमाईन्सचे आज १० प्लांट सोलापूर परिसर व आंध्र प्रदेशात कार्यरत आहेत. बालाजी अमाईन्सला सन २००२ साली आयएसओ ९००१ : २००० चे मानांकन प्राप्त झाले. आयएसओ १४००० : १८००० मानांकन प्रमाणपत्र लवकरच मिळेल, असा विश्वास बालाजी अमाईन्सचे संचालक डी. राम रेड्डी यांनी ‘तरुण भारत’शी खास बातचित करताना व्यक्त केला.
उत्पादने : जीवनावश्यक औषधे, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रबर रासायनिक शुद्धीकरण आदी उत्पादने तयार करण्यासाठी लागणारी मूल रसायने म्हणजे कच्चा माल बालाजी अमाईन्स तयार करते. औषधांपैकी मधुमेहाच्या रुग्णांना दिल्या जाणार्या औषधांत वापरल्या जाणार्या रसायनाचे उत्पादन बालाजी अमाईन्स करते. हे उत्पादन जगभर वितरित होत असून, त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याची क्षमता असलेली ही एकमेव कंपनी आहे. बालाजी अमाईन्समध्ये बरीच विशेष रासायनिक उत्पादने उत्पादित केली जातात. त्यातील ‘एनएमपी, मोरफोलिन’ ही उत्पादने अशी आहेत की, जी भारतात फक्त बालाजी अमाईन्स येथेच उत्पादित केली जातात. ही उत्पादने मागील वर्षापर्यंत भारतात आयात केली जात होती, पण आता बालाजी अमाईन्सने याचे उत्पादन सुरू केल्यापासून याची आयात जवळजवळ बंद झालेली आहे. ही आयात केवळ बंदच झालेली नसून, मागील वर्षापासून परदेशात निर्यात होऊ लागली आहेत, ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे! तर सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. २००३ साली बोल्लारम, हैदराबाद येथे नैसर्गिक उत्पादनांचा प्रकल्प सुरू झाला. तेथे तंबाखूपासून ‘सीओ-क्यू १०’ उत्पादित केले जाते. एड्स, मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना दिल्या जाणार्या औषधात याचा वापर केला जातो.
संशोधन आणि विकास : बालाजी अमाईन्सने आरंभापासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असल्याचे सांगून डी. राम रेड्डी पुढे म्हणाले की, बालाजी अमाईन्सचे प्रत्येक उत्पादन हे स्वत:च्या संशोधन केंद्रामध्ये विकसित झालेले आहे. तसेच जगातील अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रबळ संशोधन आणि विकास यंत्रणा व अद्ययावत तंत्रज्ञान हीच बालाजी अमाईन्सच्या जोमदार प्रगतीची बलस्थाने आहेत. संशोधनासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा बालाजी अमाईन्सला मिळालेला आहे. जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो.
निर्यात : आज बालाजी अमाईन्स आपल्या एकूण उत्पादनांपैकी ३० टक्के उत्पादने जगातील ४० ते ४५ देशांत निर्यात करते. त्यामुळे भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘स्टार एक्स्पोर्ट हाऊस’ चा दर्जा देण्यात आला आहे.
विस्तारीकरण : चिंचाळी औद्योगिक वसाहतीत तिसरा प्रकल्प सुरू केला असून, तेथे जीवनावश्यक औषधे व सौदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘पीव्हीपीके-३०’ हे उत्पादन डिसेंबर २००९ पासून सुरू केले आहे. या उत्पादनात बालाजी अमाईन्स भारतामध्ये एकमेव असून, जागतिक स्थरावर चीन वगळता तिसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत भारतात हे उत्पादन जर्मनी व अमेरिकेतून आयात केले जात होते. बालाजी अमाईन्सने हे उत्पादन सुरू केल्याने आयात करणे बंद तर झालेच, शिवाय येत्या काळात भारतातून निर्यात केले जाईल. चिंचोळी एमआयडीसी येथे वर्ष २०१० करिता ६० कोटींची गुंतवणूक करीत असून, विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० पर्यंत पूर्ण होईल. पुढील दोन वर्षांत कंपनीची संकल्पित उलाढाल ही ५०० कोटींची असेल.आज या कंपनीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १००० कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच रेड्डी बंधूंच्या सोलापूर व परिसरातील ४ लघुउद्योग प्रकल्पांवर ४०० कुटुंंबांना रोजगार मिळतो. कंपनीची मागील वर्षाची उलाढाल २४० कोटी असून, चालू वर्षाचे उद्दिष्ट हे ३०० कोटींचे आहे.
वीजनिर्मिती प्रकल्प : तामलवाडी येथे स्वत:च्या वीजनिर्मिती प्रकल्पातून (कॅपटिव्ह पॉवर प्लांट) प्रत्यक्ष वीजनिर्मिती नोव्हेंबर २००९ पासून सुरू केली आहे. या प्रकल्पात एकूण गुंतवणूक १४.५० कोटी रुपयांची केली गेली आहे.
पवनऊर्जा प्रकल्प :- उपलब्ध ऊर्जास्रोत आणि ऊर्जेची गरज लक्षात घेऊन सातारा व सांगली जिल्ह्यांत बालाजी अमाईन्सने दोन पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले असून, प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात देखील झाली आहे.
सीएफएल लॅम्प उत्पादन :- बालाजी अमाईन्सने ग्रीनटेक प्रॉडक्टस् लि.च्या संयुक्त विद्यमाने सीएफएल लॅम्पचे उत्पादन आंध्र प्रदेशातील सदाशिव पेठ येथे होत आहे. ही उत्पादने ‘झोरा’ व ‘बालाजी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
बालाजी अमाईन्सचे सामाजिक कार्य
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत बालाजी अमाईन्सने ‘बालाजी फाऊंडेशन व रिसर्च सेंटर’ ही ट्रस्ट सुरू करून त्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, शालेय साहित्य दिले जाते. तसेच उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. बर्याच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा साहित्य आणि खेळाचे साहित्य पुरविले जाते. बालाजी अमाईन्स व संचालकांच्या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टकडे वर्ग केला जातो.
पुरस्कार आणि सन्मान
बालाजी अमाईन्सला भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘फर्स्ट ऍवॉर्ड फॉर एक्स्पोर्ट परफॉरमन्स फॉर द ईयर ऑफ २००७-०८’ पुरस्कार जाहीर झाला. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’ तसेच सन २००८-०९ करिता ‘निर्यात श्री’ हे पुरस्कार जाहीर झाले असून, पुढील महिन्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बालाजी अमाईन्सच्या या प्रगतीला सोलापूरकरांच्या आणि दै. तरुण भारतच्या हार्दिक शुभेच्छा!
........................................................................................................ •हॉटेल उद्योगात पदार्पण
‘बालाजी सरोवर पोर्टिको’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत असल्याचे डी. राम रेड्डी यांनी सांगितले. होटगी मार्गावर १५० खोल्या, २००० क्षमतेचे बॅकेट हॉल, हेल्थ क्लब, जलतरणाची सोय असणार आहे. या प्रकल्पात सुमारे ४० कोटींची गुंतवणूक केली जात आहे. हॉटेलचे व्यवस्थापन सरोवर हॉटेल प्रा. लि.ही करणार आहे. हा हॉटेल प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट’नुसार असून, ‘इको फ्रेंडली’ प्रकल्प म्हणून ओळखला जाईल.
...............................................................................................................
•सोलापूरचा विकाससद्यस्थितीत सोलापूर हे उद्योगधंद्यांसाठी अनुकूल असून, पुढील ५ वर्षांत सोलापूरचा विकास अतिशय तीव्रगतीने होणार आहे यात शंका नाही! असा आत्मविश्वास डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केला. त्यासाठी सोलापूरकरांचे सहकार्य आणि अधिकारी व नेते मंडळींनी उद्योगवाढीसाठी सोयी-सुविधांवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगवाढीमुळे सोलापुरात कुशल कामगारांची उणीव भासण्याची शक्यता असल्याचे राम रेड्डी म्हणाले.
......................................................................................................................दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. १९ सप्टेंबर २०१०





















